धर्म व मानवसेवेसाठी विश्वेशतीर्थ स्वामींनी आयुष्य वेचले स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची भावनाः विश्वेशतीर्थांना एमआयटीत भावपूर्ण श्रध्दांजली

धर्म व मानवसेवेसाठी विश्वेशतीर्थ स्वामींनी आयुष्य वेचले
स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची भावनाः विश्वेशतीर्थांना एमआयटीत भावपूर्ण श्रध्दांजली


पुणे, 3 जानेवारी:“धर्म, राष्ट्र, समाज व मानवतेसाठी विश्वेशतीर्थ स्वामीजींनी आपले आयुष्य वेचले आहे. ते अध्यात्माक्षेत्रातील महान विभूती होते. त्यांनी केलेले कार्य आपल्या जीवनात उतरवून आचरणात आणणे हीच खरी श्रध्दांजली असेल,” अशी भावना महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचे आचार्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी व्यक्त केली.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे यांच्यावतीने पेजावर अधोक्षज मठाचे ज्ञानमठाधिपती,वेदविद्यासंपन्न, ऋषितुल्य विद्वान, महान साधन, तपस्वी, विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक, सर्वधर्मसमभावाचे पुरस्कर्ते, परमपजूनीय  व आदरणीय ज्ञानब्रह्मऋषी वै. श्री. विश्वेशतीर्थ स्वामीजी यांना कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयू येथे भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, विश्व हिंदू परिषद पुणेचे प्रमुख शरद कुंटेे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसन्तराव गाडगीळ, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.एन.टी. राव, प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे, प्रा. डॉ. आर.एम.चिटणीस, प्रा.डी.पी. आपटे, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या स्टॅटेजिक डेव्हलपमेंट अँड स्टूडेंड वेल्फरचे संचालक प्रा.डॉ. रामचंद्र पुजेरी आणि सौ. उषा विश्वनाथ कराड हे उपस्थित होते.
गोविंद गिरी महाराज म्हणाले,“माधव सेवेतून मानव सेवा हा उद्देश ठेवून त्यांनी संपूर्ण जगभर कार्य केले. विश्वची माझे घर हा संदेश देऊन त्यांनी मानवकल्यणासाठी कार्य केले. सर्वधर्म समावेश�