titleधर्म आणि प्रगत जग ' विषयावरील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण*

 


*'धर्म आणि प्रगत जग ' विषयावरील  राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण*
-------------------------------
नागरिकत्व नोंदणी असंवैधानिक : डॉ. सईद जफर मेहमूद
.....................
कोणत्याही नागरिकाची नागरिकता न्यायालयात सिध्द करण्याचे दायित्व सरकारचे :डॉ. सईद जफर मेहमूद


पुणे :


' राष्ट्रीय नागरिकत्व  नोंदणी कायदा अंसैवाधानिक आहे,कोणत्याही नागरिकाची नागरिकता न्यायालयात सिध्द करण्याचे दायित्व सरकारचे आहे. नागरिकाचे नाही. सर्व देशाकडे नागरिकत्वाचे पुरावे मागणे चुकीचे आहे. तसे करायला
हे 'बनाना रिपब्लिक ' नाही ", अशी टीका माजी प्रशासकीय अधिकारी आणी ' जकात फाऊंडेशन ' (दिल्ली ) चे अध्यक्ष डॉ.सईद जफर मेहमूद यांनी केली.


  'धर्म आणि प्रगत जग ' विषयावर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धाचे पारितोषिक वितरण   शनिवार,२१ डिसेंबर रोजी  पुण्यात आझम कॅम्पस येथे झाले . त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.


हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट ,महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ,डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट या संस्थांनी संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन केले होते .


स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी दुपारी तीन वाजता झाला. 'जकात फाउंडेशन(दिल्ली) चे अध्यक्ष डॉ.सईद जफर मेहमूद यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. डॉ. पी. ए. इनामदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.


शालेय गटपासून पदव्युत्तर गटापर्यंत एकूण अकरा गटांमध्ये,मराठी -हिंदी -इंग्रजी -उर्दू भाषांमध्ये ही स्पर्धा झाली .त्यामध्ये राज्यातून दीडशे स्पर्धकांनी सहभाग घेतला . प्रत्येक गटात पाच हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक दिले गेले. संयोजकांच्या वतीने जुबेर शेख आणि आबेदा इनामदार यांनी स्वागत केले.


स्पर्धेचे हे सातवे वर्ष होते.प्रत्येक विषयाच्या ,प्रत्येक गटातील प्रथम स्पर्धकास ५ हजार ,द्वितीय क्रमांकास ३ हजार आणि तृतीय क्रमांकास 2 हजार रुपये ,स्मृतिचिन्ह असे पारितोषिक देण्यात आले.


यावेळी आबेदा इनामदार, मुफ्ती अहमद हुसेन कासमी, हाजी अब्दुल कदीर कुरेशी , अॅड. हनीफ शेख उपस्थित होते.


डॉ. सईद मेहमूद म्हणाले, 'सच्चर कमिटीच्या शिफारशींची अंमलबजावणी केली पाहिजे. त्या साठी समाजाने पाठपुरावा केला पाहिजे.    भारतीय प्रशासकीय सेवेत मुस्लीमांचे प्रमाण अडीच टक्के  आहे. भारतीय  प्रशासकीय सेवेत मुस्लीम विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढण्या साठी प्रयत्न केले पाहिजेत.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.पी.ए. इनामदार म्हणाले, ' सर्व धर्मातील सकारात्मक गोष्टी शोधून त्यावर चर्चा घडवून आणली पाहिजे. त्यातूनच देशातील एकात्मता वाढीस लागेल. सर्वसमावेशकतेची या देशाची परंपरा आहे. वक्तृत्व स्पर्धामधील विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन ही परंपरा समाजात वाढविण्याचे काम करावे.


.......................................