*ब्रेकींग न्यूज*🔴🔴  *थंडीचा आनंद घेण्यासाठी मुंबई जवळील काही प्रेक्षणीय स्थळे*

🔴🔴 *ब्रेकींग न्यूज*🔴🔴 
*थंडीचा आनंद घेण्यासाठी मुंबई जवळील काही प्रेक्षणीय स्थळे*


*दरवर्षी आपण सर्व जण 'हिवाळा' या ऋतूची उत्सुकतेने वाट बघत असतो करण की 'हिवाळा' हा एकच असा ऋतू आहे ज्या मध्ये आपण बिनधास्तपणे फिरायला निघू शकतो. उन्हाळ्यात उन्हाच्या उष्णतेमुळे आपण जास्त घराच्या बाहेर पडत नाही सोबतच पावसाळ्यातही आजारी पडण्याच्या भीतीमुळे आपण बाहेर निघायला टाळतो.👉यामुळे हिवाळा हाच एकमेव असा ऋतू आहे ज्यामध्ये आपण आरामात स्वेटर घालून कुठेतरी बाहेरगावी फिरायला निघू शकतो आणि या गुलाबी थंडीचा आनंद घेऊ शकतो. तर, अश्या प्रकारे आज आम्ही मुंबईकरांसाठी ५ असे प्रेक्षणीय स्थळे सांगणार आहोत जिथे तुम्ही थंडीचा आनंद घेऊ शकता.*


👉 *१) अलिबाग:-*


*अलिबाग हे मुंबईपासून १०० किलोमीटर अंतरावर स्थित आहे.*


*अलिबाग हे सुंदर बीच आणि कनकेश्वर यासाठी प्रसिद्ध आहे. अलिबाग जवळ अनेक असे पर्यटन स्थळे देखील आहेत जिथे आपण हिवाळ्याच्या आनंद घेऊ शकतो.👉अलिबाग, मुरुड जंजिरा, पेण रस्त्यावरील सिद्धेश्वर मंदिर, बिर्ला मंदिर असे अनेक प्रेक्षणीय स्थळे येथे आहेत. वरसोली, काशीद आणि नागावचे सुंदर आणि शांत बीचचा आनंद देखील आपण लुटू शकतो. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया पासून अलिबाग पर्यंत आपण बोटने प्रवास करू शकतो. या सोबतच आपण बोट चा आनंद देखील घेऊ शकतो.*


👉 *२) गणपतीपुळे:-*


*रत्नागिरी जिल्ह्यात असलेलं गणपतीपुळे हे गाव गणपतीच्या देऊळ साठी प्रसिद्ध आहे. विशेषतः गणपतीचे मंदिर समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे हे इथले प्रमुख आकर्षण आहे.👉समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांसाठी काही वॉटर स्पोर्ट्स ची देखील सुविधा उपलब्ध आहे. गणपतीपुळे जवळील काही प्रेक्षणीय स्थळे- लाईटहाऊस, आरे वारे बीच, जयगड किल्ला असे अनेक स्थळे आहेत. मुंबई किंवा पुण्याहून आपण रत्नागिरी पर्यंत एसटी बस किंवा रेल्वे द्वारे जाऊ शकतो. रत्नागिरीहून मग आपण बस किंवा टॅक्सीने गणपती पुळे पर्यंत जाता येतं.*


👉 *३) हरिहरेश्वर:-*


*हरिहरेश्वर हे कोकणातील निसर्गरम्य आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हरिहरेश्वर येथे सावित्री नदी आणि अरबी समुद्राचं संगम देखील बघायला मिळते.👉हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे सोबतच येथे हिरवेगार डोंगर, सावित्री नदी आणि अरबी समुद्र असे मिश्रित निसर्गसौंदर्य येथे बघायला मिळते. मुंबई-गोवा रस्त्यावरील दासगाव पासून एक फाटा फुटतो तेथून आपण श्रीवर्धन पर्यंत जाऊ शकतो आणि श्रीवर्धनहून मग बोटने हरिहरेश्वरला जात येते.*


👉 *४) चिपळूण:-* 


*चिपळूण हे निसर्गसौंदर्याने भरपूर असे गाव रत्नागिरी जिल्ह्यात स्थित आहे. चिपळूण मुख्य म्हणजे परशुराम मंदिर आणि गावातील वातावरणामुळे ओळखलं जातं. परशुराम मंदिर हे ७०० वर्ष प्राचीन मंदिर आहे सोबतच येथे वाशिष्ठी नदी आहे जिथे मोटरबोटिंग व इतर वॉटर स्पोर्ट्स चा आनंद घेता येतो.चिपळूण जवळ एक गावलकोट किल्ला देखील आहे. अशाप्रकारे आपण हा हिवाळा चिपळूण मधील मन रम्य वातावरणात घालवू शकतो. मुंबई किंवा पुण्याहून आपण चिपळूण पर्यंत एसटी बस किंवा रेल्वेद्वारे जाऊ शकतो.*


👉 *५) दापोली:-*


*दापोली हे रत्नागिरी जिल्ह्यात स्थित असलेला तालुका बीच आणि तेथील थंड वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. तसे बघायला गेले तर दापोलीला भरपूर असे पर्यटक आकर्षण आहेत जिथे आपण हा हिवाळा मनसोक्त घालवू शकतो. मुरुड किनारा, दापोली पर्यटक हर्णे बंदर, लाईट हाऊस ही दापोली येथील काही महत्त्वाचे पर्यटन स्थळे आहेत.*


👉 *मुंबई किंवा पुण्याहून आपण पेण पर्यंत एसटी बस किंवा रेल्वेने येऊ शकतो. पेणहुन मग लोकल बस किंवा टॅक्सी द्वारे आपण दापोली पर्यंत येऊ शकतो. सोबतच दापोली जवळचं रेल्वे स्टेशन हे खेड गावात आहे. खेड हुन मग बस किंवा टॅक्सी ने दापोली पर्यंत जात येते.*