नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी आज दुपारी नेरळ बाजारपेठ भागातील रस्त्यांची पाहणी केली
नेरळ हे माथेरान या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या शहरचे प्रवेशद्वारे समजले जाते. परंतु याच नेरळ मध्ये वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहन पार्किंग हि सर्वांना भासत असलेली समस्याच आहे. मात्र त्यावर मात करण्यासाठी आणि वाहनचालक यांना शिस्त लावण्यासाठी बैठका घेणारे नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी आज दुपारी नेरळ बाजारपेठ भागातील रस्त्यांची पाहणी केली आणि जय हिंद नाका येथे रिक्षा चालक यांना काही सूचना केल्या. मात्र त्या सूचना मन्या न करता 200 हुन अधिक रिक्षा नेरळ पोलीस ठाण्यात पोहचल्या असता नेरळ पोलिसांना तो वाहतूक नियम तात्पुरता रद्द करावा लागला आहे.  

                      नेरळ गावात असलेल्या पोलीस ठाण्यात काही महिन्यापूर्वी अविनाश पाटील हे पोलीस अधिकारी म्हणून आले.नेरळ गावात असलेल्या बाजारपेठ भागातील अरुंद रस्ते आणि त्या रस्त्यांवर कोणत्याही प्रकारची शिस्त नसलेली वाहनाची पार्किंग यामुळे सतत वाहतूक कोंडी झालेली दिसून येते. त्याच नेरळ गावाला माथेरान या जागतिक दर्जाच्या थंड हवेच्या ठिकाणाची पार्श्वभूमी आहे. नेरळ हे गाव माथेरान या थंड हवेच्या ठिकाणचे प्रवेशद्वार समजले जाते. परंतु शहरात होणारी वाहतूक कोंडी हि माथेरान ला जाणारया वाहनांसाठी वाहतूक कोंडी हि समस्या त्रासदायक ठरते. त्यामुळे वाहतूक कोंडीवर आणि जागोजागी करून ठेवलेल्या वाहन पार्किंग यामुळे नेरळकर हैराण आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी वर मार्ग काढण्यासाठी नेरळ पोलीस ठाण्यात 23 डिसेंबर 2019 रोजी बैठक घेण्यात आली होती.त्या बैठकीला नेरळ मधील सर्व रिक्षा चालक यांचे प्रतिनिधी तसेच व्यापारी,आणि ग्रामपंचायत यांचे प्रतिनिधी आणि मधील राजकीय पक्षांचे प्रमुख यांना बोलाविण्यात आले होते. नवीन वर्षांपासून वाहतूक शिस्त लागू करण्याचा निर्णय नेरळ पोलिसांनी घेतला होता. 

                          त्यावेळी कडक शिस्तीचे अधिकारी असलेले अविनाश पाटील यांनी आज 24 डिसेंबर रोजी नेरळ मधील बाजारपेठ भागात नो पार्किंग झोन तसेच रिक्षांचे नियोजन करण्यासाठी सरपंच रावजी शिंगवा यांच्यसह नेरळ मध्ये पाहणी केली. त्यावेळी नेरळ रेल्वे स्टेशन समोर असलेल्या जयहिंद नाका येथे एकाच ठिकाणांवरीवून दामत,भडवल आणि ममदापुर या तीन गावांसाठी रिक्षा वाहतूक होते. स्टेशन परिसर असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दर दिवशी होत असते. हे लक्षात घेता सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी तिन्ही गावात जाण्यासाठी प्रत्येकी दहा रिक्षा उभ्या करण्याचे जाहीर केले. त्याचवेळी त्यावेळी या तिन्ही स्टॅन्ड वर व्यवसाय करणारी 200खांडा मैदान येथे थांबवून ठेवाव्यात असे सूचित केले.पोलीस अधिकारी पाटील यांची हि सूचना रिक्षाचालक यांना मेनी नसल्याने त्या सर्व रिक्षाचालक यांनी त्याच ठिकाणी आम्हाला रिक्षा लावण्यासाठी पर्यायी जागा द्या अशी सूचना केली. मात्र पोलीस आपल्या वाहतूक बदलाच्या भूमिकेवर ठाम होते हे पाहून रिक्षाचालकी हे आक्रमक झाले. 

               त्यानंतर सायंकाळी दामत,ममदापुर आणि भडवल या ठिकाणी रिक्षा व्यवसाय करणारे सर्व रिक्षा चालक हे आपली वाहने घेऊन नेरळ पोलीस ठाण्यात पोहचले.तेथे या रिक्षा संघटना यांचे प्रतिनिधी यांनी सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांना आपली पर्यायी जागेची सोय होत नाही तोवर वाहतूक बदल करू नये असे सूचित करण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यातील कोणतेही सूचना यात बदल केले जाणार नाहीत अशी भूमिका पोलीस अधिकारी पाटील यांनी जाहीर केली. त्यामुळे नेरळ पोलीस ठाण्यातील वातावरण काही काळ गरम झाले होते.परंतु त्यानंतर देखील पोलिसांनी रिक्षाचालक यांची कोणतेही सूचना आणि विनंती मान्य केली नसल्याने रिक्षाचालक आणि पोलीस यांच्यातील वाद पुढील काही दिवस तापलेला राहणार आहे.