स्व.राणीदेवी तथा स्व.शांतीलालजी कवाड स्मरणार्थ रक्तदान शिबीर संपन्न.

शांती सेवा संघ(कवाड-जैन)ग्रुपच्या वतीने स्व.राणीदेवी व शांतीलालजी कवाड(जैन) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यात ८१ जणांनी रक्तदान केले.सुधर्म सोसायटी लक्ष्मीनारायण टॉकी मागे झालेल्या या शिबीर प्रसंगी गुलाबचंद कवाड(जैन),परसमल कवाड(जैन),गणपतराज कवाड(जैन),अशोककुमार कवाड(जैन),दशरथ कवाड(जैन),दिलीप कवाड(जैन)प्रमुख पाहुणे डॉ.सतीश देसाई,कांतीलाल ओसवाल(जितो अध्यक्ष),राम बांगड(रक्ताचे नाते),अजय मेहता,प्रकाश धोका,भरत जैन आदि मान्यवर उपस्थित होते.शिबिराचे तांत्रिक संचालन रुबी हॉल क्लिनिक व भारती हॉस्पिटलने केले.डॉ.अनिकेत ओसवाल यांनी १६२ नागरिकांची जनरल चेकअप(तपासणी)केली.भरत जैन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.