अभेद्य सह्याद्री पवर्तरांगा मधील पेठ किल्ला होणार बंदिस्त.. सह्याद्री प्रतिष्ठान चा प्रयत्न कर्जत, दि .28  गणेश पवार
अभेद्य सह्याद्री पवर्तरांगा मधील पेठ किल्ला होणार बंदिस्त..

सह्याद्री प्रतिष्ठान चा प्रयत्न

कर्जत, दि .28  गणेश पवार

                        महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य कर्जत विभागाकङून प्रवेशव्दाराला सागवानी दरवाजा येत्या रविवारी 29ङिसेंबरला बसविण्यात येणार आहे.

                    महाराष्ट्रातील राज्यातील एक किल्ला आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळ्च्या पूर्वेला एकोणीस किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला बावीस किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ल्ला आहे.पेठ गावानजीक असल्याने पेठेचा किल्ला म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो कर्जतच्या मूळ डोंगररांगेपासून तुटून वेगळा पडलेला आहे. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे. या नरसाळ्यालाच कोथळीगड म्हणतात.किल्ला छोटा आहे पण पायथ्याची गुहा मोठी आहे. गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरून काढले आहेत. गुहेमधून एक आडवातिडवा कोरून काढलेला दगडी जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. वर जागा अगदी थोडी आहे.किल्ल्याचा दरवाजा अजून उभा आहे,आत पाण्याची दोन टाकी आहे.

                           सह्याद्री प्रतिष्ठान गेली दहा वर्षे गडकोटांच्या संवर्धनासाठी काम करीत आहे.बावीस डिसेंबर रोजी संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.जवळपास चारशे किलो वजनी सागवानी दरवाजा अत्यंत बिकट वाटेतून गडावर नेण्याचे कार्य सह्याद्री प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी केले आहे.यामध्ये कर्जत, खालापूर, अंबरनाथ, मुंबई आणि पुणे येथील साठ हून अधिक सदस्य सहभागी झाले होते.येत्या रविवारी  कोथळीगडावरील प्रवेशद्वार बसविण्याचा सोहळा सकाळी आठ वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने या ऐतिहासिक सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून सुप्रसिद्ध शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील,केशव उपाध्ये,सुप्रसिद्ध मराठी कलाकार रमेश परदेशी,जयवंत वाडकर व महेश कोकाटे या सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

 

 

 

 

रोहिदास ठोंबरे-गिर्यारोहक चौक गाव)

संस्थेचे संस्थापक आणि महाराष्ट्र शासन दुर्गसंवर्धन समितीचे सदस्य  श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे सर यांच्या नेतृत्वाखाली नवशे हून अधिक दुर्गसंवर्धन मोहिमा राबविण्यात आल्या आहेत.गङाला दरवाजा म्हणजे गतवैभव असे वाटते.या मोहिमेत मी पहिल्यांदा सहभागी होत असून अभिमान वाटतो.

छाय ः  गणेश पवार