.श्रीराम लागू यांच्या स्मरण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

,
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने डाँ.श्रीराम लागू यांच्या स्मरण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि.२७/१२/२०१९ रोजी सायं.६वा.टिळक स्मारक मंदिर पुणे येथे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी डॉ. लागू यांच्या विषयीच्या आठवणींना पुढील मान्यवर उजाळा देणार आहेत.
१- डॉ. जब्बार पटेल- १००व्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष.
२- प्रेमानंद गज्वी- ९९व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष.
३-सतिश आळेकर- ज्येष्ठ नाटककार
४-डॉ. मोहन आगाशे-ज्येष्ठ नाटककार
५-अतुल पेठे- नाट्य दिग्दर्शक
६-श्यामलाताई वनारसे- ज्येष्ठ लेखिका व रंगकर्मी.
७- हमीद दाभोळकर- अंधश्रद्धा निर्मूलन समिती.
आपण स्वतः किंवा आपला प्रतिनिधी या सभेसाठी उपस्थित असावा ही नम्र विनंती.
आपण ही माहिती आपल्या वर्तमान पत्रातून प्रसिद्ध केल्यास डॉ. श्रीराम लागू यांच्या अनेक चाहत्यांना या कार्यक्रमाची माहिती होऊन कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवणे शक्य होईल.
आपले नम्र.
मेघराज राजेभोसले - अध्यक्ष-अ.भा.म.चित्रपट महामंडळ
प्रा.मिलिंद जोशी- अध्यक्ष- महाराष्ट्र साहित्य परिषद.
प्रसाद कांबळी- अध्यक्ष- अ.भा.म.नाट्य परिषद.