माथेरान वेगळेपण जपणार पर्यटनस्थळ:-अभिनेता मिलिंद गुणाजी

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


माथेरान वेगळेपण जपणार पर्यटनस्थळ:-अभिनेता मिलिंद गुणाजी

कर्जत,ता.4 गणेश पवार

                 महाराष्ट्रामध्ये अनेक पर्यटनस्थळ आहेत,ती सर्व पर्यटनस्थळे सारखीच वाटतात.पण माथेरान हे असं पर्यटनस्थळ आहे,की या पर्यंटनस्थळाने आपले वेगळेपण जपले असून हे एक युनिक पर्यटनस्थळ आहे असे माथेरानवर निस्सीम प्रेम करणारा अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी हे वक्तव्य केले असून फिरण्यासाठी ते माथेरान मध्ये आले होते.

                       माथेरान मधील  दिवाडकर हॉटेलचे मालक संदीप दिवाडकर व लक्ष्मी हॉटेलचे निमेष मेहता यांच्यासोबत माथेरानची भटकंती करणारे अभिनेता मिलिंद गुणाजी हे लहान असताना आपल्या आईबाबांसोबत माथेरान मध्ये येतात.माथेरानच्या निसर्गाचा मोह त्यांना आवरत नसल्याने त्यांची पावले आपोआप माथेरान कडे वळतात.मोटार वाहनांचा आवाज नाही,सर्वत्र पक्षांचा किलबिलाट,निरव शांतता,मोह घालणारा निसर्ग,लाल मातीचे रस्ते,हिरवीगार वनराई हे फक्त येथेच पहावयास मिळते.मिनिट्रेनची रंजक सफर हे माथेरानचे वैशिष्ट्य.या मिनिट्रेनच्या सफारीचा अनुभव काही वेगळाच.नागमोडी वळणे. या ट्रेन मध्ये बसल्यानंतर ती मार्गस्थ होताना आपण तिथेच आहोत व झाडे मागे पळतात असा भास हमखास होतो त्यामुळे माथेरान हे युनिक पर्यटनस्थळ आहे.त्यामुळे खरी भटकंती करावी ती माथेरान मध्येच.