कोरोना कालावधीपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा बंद असलेला परिसर नागरिकांसाठी खुला करण्याचे आश्वासन...नगरसेविका सुनिता वाडेकर

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


*कोरोना कालावधीपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा बंद असलेला परिसर नागरिकांसाठी खुला करण्याचे आश्वासन...*

--------------------------

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर वृक्षसंपदेने आणि दुर्मीळ औषधी वनस्पतींनी संपन्न असून तेथील नैसर्गिक वातावरण नागरिकांसाठी आरोग्यदायी आहे. परिसरातील नागरीक व ज्येष्ठांसाठी व्यायाम व फेरफटका मारण्यासाठी विद्यापीठ खुले करावे यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे *

कुलगुरु नितीन करमळकर सर* यांना नगरसेविका व रिपाई गटनेत्त्या*सौ.सुनिता परशुराम वाडेकर* यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.विद्यापीठाचा परिसर लवकरच आढावा घेवून खुला करण्यात येईल अशी ग्वाही कुलगुरू करमळकर सर यांनी दिली.या प्रसंगी.. *डॉ.विजयजी खरे*(प्रो.हेड डिपार्टमेंट सावित्रीबाई फुले विद्यापीठ) *अविनाश कदम* (अध्यक्ष शिवाजीनगर मतदार संघ रिपाई) *विजय ढोणे,आप्पासाहेब वाडेकर ॲड.ज्ञानेश जावीर* आदी उपस्थित होते.