गर्लफ्रेंडला त्रास दिल्याचा रागातून मित्राचा धावत्या दुचाकीवरच कापला गळा

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


⭕ गर्लफ्रेंडला त्रास दिल्याचा रागातून मित्राचा धावत्या दुचाकीवरच कापला गळा.......

भोसरी  स्वतः गर्लफ्रेंडला त्रास देत असल्याच्या रागातून मित्राने धावत्या गाडीवर मित्राचाच गळा कापल्याची भयंकर घटना भोसरीमध्ये घडली आहे.

 याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

आरोपी व जखमी तरुण मित्र आहेत. 

अभिषेक उर्फ आकाश मधुकर कांबळे असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे.

 तर किरण शिवाजी थोरात असं आरोपीचं नाव आहे. 

जखमी तरुणावर उपचार सुरू असून, शुभम मधुकर कांबळे यांनी एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दिली. 

जखमीवर सध्या उपचार सुरू आहेत. 

या घटनेविषयी पोलिसांनी माहिती दिली.

 आरोपी किरण आणि जखमी अभिषेक हे दोघे मित्र आहेत. 

तर, अभिषेकची गर्लफ्रेंड ही आरोपी किरणची मानलेली बहीण आहे. 

अभिषेकचे मानलेल्या बहिणी सोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती किरणला होती. 

त्यातच गेल्या काही दिवसांपासून अभिषेकचे गर्लफ्रेंडसोबत किरकोळ कारणावरून खटके उडत होते. 

त्यांच्यात भाडंण होत होती. 

त्यामुळे त्यांचं पटतही नव्हतं. 

याचा त्रास आरोपी किरण थोरात याला होत होता. 


⭕शुक्रवारी नेमकं काय घडलं  ? 


जखमी अभिषेक आणि आरोपी किरण हे दोघे एकाच दुचाकीवरून शुक्रवारी इंद्रायणी नगर येथून बालाजी नगरकडे जात होते. 

भोसरी टेल्को रोडवर येताच किरणने लघु शंका आल्याचं सांगून अभिषेकला दुचाकी थांबवण्यास सांगितलं. 

धावत्या दुचाकीचा वेग काही प्रमाणात कमी होताच पाठीमागे बसलेल्या किरणने कटरने अभिषेकच्या गळ्यावर वार करून मारण्याचा प्रयत्न केला. 

त्यानंतर धावत्या दुचाकीवरून उडी घेऊन आरोपी किरण घटनास्थळावरून पसार झाला.

 दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभिषेक रिक्षाच्या मदतीने रुग्णालयात धाव घेतली. 

त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

 त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.