नामांतराचे राजकारण...!

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


नामांतराचे राजकारण...!

पुणे औ‌रगाबांदचे  नाव संभाजीनगर करायला वेळ लागत असेल तर... राष्ट्रमाता जिजाऊंनी बेचिराक झालेल्या पुणे'ला वसवलं. त्या पुण्याला जिजाऊंचे नाव देऊन पुण्याचे 'जिजापूर' असे नामांतर करून टाका. पुण्याला जिजाऊंचा इतिहास आहे.शिवनेरी पासून लाल महाल पर्यंत आणि पुरंदर पासून तोरणा, राजगड, सिंहगड, विसापूर, लोहगड, राजमाची, विचित्रगड ते स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर पर्यंत... सह्याद्री ओरडून ओरडून कर्तुत्व आणि पराक्रमाचा इतिहास सांगत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आपला पुणे जिल्हा आहे. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आहे. पुण्यात राष्ट्रमाता जिजाऊंनी बाल शिवबा'ला घेऊन सोन्याचा नांगर चालून पुणे वसवलं, त्या पुण्याचं आज सोनं झालेले आहे. घडलं ते रयतेच स्वराज्य.

नामांतराचे गलिच्छ राजकारणाचा करू नका. इतिहासातील प्रतिकांचा आदर करा. आमचा वारसा आम्हाला अजून गौरवपुर्वक चालवू द्या. म्हणून पुण्याला 'जिजापुर' हे नाव द्या...


जय जिजाऊ...!! जय शिवराय...!!

 संतोष शिंदे, प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र