पुणे विभागातील 5 लाख 43 हजार 187 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 5 लाख 66 हजार 289 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


पुणे विभागातील 5 लाख 43 हजार 187 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 5 लाख 66 हजार 289 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

 

       पुणे,दि.5 :- पुणे विभागातील 5 लाख 43 हजार 187 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 66 हजार 289 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 7  हजार 393 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 709 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.77 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.92 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 65 हजार 23  रुग्णांपैकी 3  लाख 50 हजार 668 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 5  हजार 592 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 763  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.40 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  96.07 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 54 हजार 633 रुग्णांपैकी 52 हजार 231 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  632 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 770 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 408 रुग्णांपैकी 46 हजार 745 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 931 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 732 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

  सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 47  हजार 656 रुग्णांपैकी 45 हजार 733 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 188 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1  हजार 735 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 49 हजार 569 रुग्णांपैकी 47  हजार 810 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  50 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार  709 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 508 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 327 , सातारा जिल्ह्यात 101, सोलापूर जिल्ह्यात 56, सांगली जिल्ह्यात 18 तर कोल्हापूर जिल्ह्यात 6 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण - 

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 582 आहे. पुणे जिल्हयामध्ये 394, सातारा जिल्हयामध्ये 129, सोलापूर जिल्हयामध्ये 40, सांगली जिल्हयामध्ये 13 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 6 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 33 लाख 58 हजार 662 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  5 लाख  66 हजार 289  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

 

( टिप :- दि.  4 जानेवारी 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

*****

Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image