पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*माध्यम कक्षात कामात व्यस्त असलेल्या कॅमेरामन संजय गायकवाड यांचा वाढदिवस पत्रकारांनी केला साजरा*
पुणे, दि. 3 : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आज मतमोजणी बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रिडा संकुलात सुरू झाली, मतमोजणीच्या वार्तांकन चित्रीकरणासाठी सकाळपासून माध्यमांना व्हिडीओ चित्रीकरण देणारे विभागीय माहिती कार्यालयातील कॅमेरामन संजय गायकवाड यांचा आज वाढदिवस. कायम सकारात्मक असलेल्या गायकवाड यांचा वाढदिवस माध्यम कक्षातच साजरा करण्यात आला, पत्रकार बांधवांनी केक कापून गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
बालेवाडी येथे निवडणूक अपडेट देण्यासाठी उभारण्यात आलेल्या माध्यम कक्षात वाढदिवसाच्यावेळी उपसंचालक राजेंद्र सरग, टीव्ही-9 च्या अश्विनी सातव, सामनाचे विठ्ठल जाधव, प्रभातचे गणेश आंग्रे, पुढारीचे समीर सय्यद,लोकमतच्या सुषमा नेहरकर, उमेश शेळके, सुजीत तांबडे, नरेंद्र साठे,
माहिती सहायक गणेश फुंदे, संदीप राठोड, विलास कसबे, मिलिंद भिंगारे,सुहास सत्वधर, विशाल कार्लेकर, संतोष मोरे, चंद्रकांत खंडागळे,
दिलीप कोकाटे, मोहन मोटे, संजय घोडके, जितेंद्र खंडागळे,
विशाल तामचीकर, लोकेश लोहोट आदी
उपस्थित होते.
00000