पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीत श्री.अरुण लाड विजयी
पुणे, दि. 04- पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. अरुण गणपती लाड विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले.
श्री. अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली. एकूण मतदान 2 लाख 47 हजार 687 इतके झाले त्यापैंकी 2 लाख 28 हजार 259 मते वैध तर 19 हजार 428 इतकी मते अवैध ठरली.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले, निवडणूकीसाठी एकूण 62 उमेदवार निवडणूक लढवीत होते. उमेदवारांची नावे व मिळालेली मते खालीलप्रमाणे आहेत.
0000
सा.पुणे प्रवाह न्युज परिवाराकडून
पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार अरुणजी लाड यांचे जाहीर अभिनंदन आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा