वर्षाअखेरीस गायिका 'सावनी रविंद्र' चाहत्यांना देणारं सांगितीक भेट

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


वर्षाअखेरीस गायिका 'सावनी रविंद्र' चाहत्यांना देणारं सांगितीक भेट


आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे 'सावनी रविंद्र'. लॉकडाऊन नंतर ती प्रथमच ‘सोनी मराठी’वरील ‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमात झळकली होती. सावनी सोशल मिडीयावर देखील अॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने तीच्या लेटेस्ट फोटोशूटचे ग्लॅमरस फोटोज् सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.


सावनीने मराठीसह, हिंदी, तमिळ, गुजराती, बंगाली, कोंकणी अश्या विविध भाषेत अनेक गाणी गायली आहेत. त्यामुळे तिचे भारतातचं नव्हे तर जगभर चाहते आहेत. शिवाय तिने इंस्टाग्रामवर २५० के फोलोअर्सचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर तिच्या चाहत्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे.

गायिका सावनी तिच्या चाहत्यांना वर्षाअखेरीस एक सांगितीक भेट देणार आहे. याविषयी ती म्हणते, ''२०२० हे वर्ष सगळ्यांसाठीच खूप चढउताराचं होतं. या वर्षाचा शेवटं गोडं करण्यासाठी आणि माझ्या सर्व फॅन्ससाठी मी नविन मॅशअप गाणं घेऊन येत आहे. त्यावर मी सध्या काम करत आहे. या डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात माझ्या ऑफिशीअल युट्यूब चॅनेलवर ते गाणं रिलीज होईल. तसेच मी माझ्या युट्यूुब चॅनेलवरून दर महिन्यातून एकदा लाईव्ह जॅमिंग सेशन सुरू करणार आहे. जेणेकरून माझं चाहत्यांप्रतीचं प्रेमं मी व्यक्तं करू शकेन.''

गायिका सावनी रविंद्र तिच्या चाहत्यांसाठी वर्षाअखेरीस कोणतं नवं गाणं घेऊन येत आहे. हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेलं.

Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
एम. सी.ई सोसायटीच्या इंग्लीश मिडियम स्कूल आयोजित क्रीडा करंडक स्पर्धेत 'सर सय्यद अहमद हाऊस' विजयी*                                                                                    
Image
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या