क्लिअरट्रिपद्वारे ग्राहकांसाठी 'ट्रॅव्हलसेफ' सादर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


~ सुरक्षित प्रवासाभोवतीच्या ग्राहकांच्या समस्येवर लक्ष देणारा उत्कृष्ट उपाय ~


 


मुंबई, २२ जून २०२०: सुखकर प्रवासासाठीची वचनबद्धता अधोरेखित करत, क्लिअरट्रिप या बाजारातील नवोदित अग्रगण्य प्रवास तंत्रज्ञान मंचाने ‘ट्रॅव्हलसेफ’ हे समाधान मध्य पूर्व आणि भारतातील सर्व ग्राहकांसाठी सादर केले आहे. प्रवासादरम्यान पाळायचे नियम, नवे ट्रेंड्स, प्रवासाच्या योजना, सुरक्षिततेचे उपाय, नियमावली, विमान प्रवासातील नियामक धोरणे या सर्वांची सखोल माहिती ग्राहकांना यात उपलब्ध होईल.


 


ग्राहकांच्या सुरक्षिततेबाबतच्या चिंता दूर करणे आणि विविध सरकारांनी, विमानतळ आणि पुरवठादारांनी जाहीर केलेल्या विविध बदलांना विचारात घेता ग्राहकांना प्रवासाची योजना आखण्याच मदत करणे, हा ट्रॅव्हलसेफचा उद्देश आहे. ट्रॅव्हलसेफ हे कोणत्याही बदलांनुसार नेहमी अद्ययावत केले जाते. तसेच संबंधित डोमेनसाठी सामग्री तयार केली जाते.


 


क्लिअरट्रिपचे सीईओ स्टुअर्ट क्रिग्टॉन म्हणाले, “आजाराच्या साथीमुळे प्रामुख्याने ग्राहकांच्या वर्तणुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच प्रवास योजनांमध्ये सुरक्षिततेला आम्ही प्राधान्य दिले आहे. ग्राहकांना प्रवासादरम्यान येणाऱ्या सर्व सुरक्षिततेचे प्रश्नांचे व्यवस्थापन करून दाखवणे, या उद्देशातून आम्ही ट्रॅव्हलसेफची बांधणी केली आहे. आमचा कंटेंट आम्ही नियमितपणे अद्ययावत करत राहू तसेच आमच्या ग्राहकांना प्रवास अधिक सहज व्हावा, यासाठी सर्वोत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न करू”.


Popular posts
*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
कोरोना विषयी काळजी म्हणून .......दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
श्री शंतनु भामरे यांची *राष्ट्रीय चेअरमन संशोधन आणि विकास सेल आणि राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी* निवड - अखिल भारतीय सुवर्ण संस्था सामाजिक विकास व संशोधन संस्था ( ABSSVSS)