नेरळ खांडा पुलाच्या बाजूला कोंबड्यांची पिसे आणि आतडी

 पुणे प्रवाह न्युज पोर्टलनेरळ खांडा पुलाच्या बाजूला कोंबड्यांची पिसे आणि आतडी 

कर्जत,ता.21 गणेश पवार

                  नेरळ गावातील टॅक्सी स्टँड जवळ असलेल्या खांडा पुलाखाली कोंबडयाची आतडी आणि पिसे टाकणा-यांनावर ग्रामपंचायत मार्फत कारवाई करण्याची उल्हास नदी बचाव मार्फत मागणी केली आहे.उल्हास नदी स्वच्छतेसाठी धडपणा-या तरूणाईने धडपड सुरू केली आहे.

              गेल्या अनेक दिवसापासून पाहणीअंती असे निदर्शनास आले की नेरळ विभागातील मांस विक्रेते कोंबडयाची आतडी आणि पिसे खांडा परिसरातील पुलावरून वाहणा-या पाण्यात ही घाण टाकत असून हा नाला पुढे उल्हासनदीला जोडला गेला असून ही सर्व घाण नदित जमा होऊन पाणी दुषित होत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून असेच सुरू राहिले तर येणा-या काळात उल्हास नदीचे पाणी पिण्यासाठी अथवा वापरासाठी योग्य राहणार नाही हीच बाब लक्षात घेऊन उल्हास नदी बचाव मोहिमेचे पुरस्कर्ते केशव तरे व त्यांचे सहकारी गोविंद घुले, अर्जुन भोईर, घुले स्वप्नील वाघमारे, महेंद्र मराडे, बिटु डोईफोडे यांनी नेरळ ग्रामपंचायतीचे लक्ष वेधले असून काल यासंदर्भात उपसरपंच शंकर घोडविंदे आणि ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हसकर यांची भेट घेवून सदर विषयी उपाययोजना करण्यासंदर्भात निवेदन दिले.

                  माथेरानच्या डोंगर द-यांतून येणारे पाणी या ओढ्यात वाहत असून नेरळमधील खांडा परिसरातून वाहणारा हा ओढा बाराही महिने वाहत आहे. या ओढ्याच पाणी पुढे उल्हासनदीला जाऊन मिळाल्यामूले उल्हासनदीचे पाणी प्रदूषित होते परिणामी उल्हासनदीच्या तीरावर वसलेल्या गावांना प्रदूषित पाणी प्यावे लागत आहे. या प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल. यामुळे साथीचे आजार उद्भवू शकतात त्या अनुषंगाने उल्हासनदी बचाव: मोहिमेअंतर्गत गेल्या दोन वर्षापासून उल्हासनदी संवर्धन आणि प्रदूषण रोखण्यासाठी केशव तरे आणि त्यांचे सहकारी कार्यरत आहेत. अशाप्रकारे जर नदी प्रदुषण होत असेल तर ही गंभीर बाब आहे आणि यावर वेळीच नियंत्रण आले पाहिजे. नागरिकांनी आपल्या परिसर आणि नदीबाबत जागृक राहिले पाहिले अन्यथा येणा-या काळात आपल्याला पाणी समोर दिसत असूनही पिण्यायोग्य असणार नाही म्हणून वेळीच जागे व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

फोटो ओळ