पुणे प्रवाह न्युज पोर्टल


बार्डी गावात रंगला संत ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव

कर्जत,ता.15 गणेश पवार

                     कर्जत तालुक्यातील बार्डी गावात गेल्या दोन वर्षांपासून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा समाधीउत्सव साजरा होतो आहे.यंदाही हा उत्सव साजरा झाला.परंतु कोरोना महामारीमुळे यंदाच्या कार्यक्रमाचे स्वरूप छोट्या प्रमाणात होते. ह.भ.प. विजय महाराज थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा झाला.

                  प्रवचनातून युवापिढीला प्रबोधनपर विचार देताना ते म्हणाले की संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिला.सर्व स्तरातील समाजाला एकत्र घेऊन त्यांनी समतेची आणि महासुखाची वारी केली.प्रबोधन केले,परंतु आजची युवापिढी ही संभ्रमित झालेली दिसते आहे.त्यामुळे युवापिढीने माऊलींचे विचार आत्मसात करून यश संपादन केले पाहिजे,आनंदी जीवन जगले पाहिजे.

       कोरोनामुळे यंदा कीर्तन झाले नाही,मंदिरात पहाटे काकडआरती झाली,सकाळी नऊ वाजता माऊलींच्या प्रतिमेचे पूजन झाले. यानंतर ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण झाले,दुपारी प्रवाचनानंतर ग्रामस्थांच्या उपस्थित सायंकाळी चार वाजता दिंडीसोहळा आणि नंतर रात्री जागर भजन रंगले.

फोटो ओळ