सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन" संपन्न

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल**प्रसिध्दीपत्रक*


*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन" संपन्न*


*पुणे :-* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी जयकर ग्रंथालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास तसेच समाजशास्त्र विभागाच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळयास आणि पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मा. सुभाष वारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. या प्रसंगी प्र- कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव, तसेच डॉ. विजय खरे, डॉ. धनंजय लोखंडे, डॉ विलास आढाव, डॉ. सुनिल धिवार तसेच विविध विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, शिक्षकेतर सेवक व विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.