80 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात..!

पुणे प्रवाह न्युज पोर्टल**80 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात..!*


*पुणे :-* पंजाब चे शेतकरी बांधव आपल्या न्याय हक्कासाठी मैदानात उतरले आहेत.जवळपास लाखभर ट्रॅक्टर आणि करोडो शेतकरी बांधव दिल्लीच्या आसपास ठाण मांडून बसले आहेत.आता या बांधवांच्या हित रक्षणासाठी पवार साहेब देखील सरसावले आहेत.


पवार साहेबांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटल आहे की, 


"सर्वात जास्त शेती आणि देशातील नागरिकांना होणाऱ्या अन्नपुरवठ्याबाबत विचार केला तर सर्वात जास्त योगदान पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचं आहे. गहू आणि तांदूळ उत्पादनात हे राज्य देशाची तर गरज भागवतातच, यासोबत आणखीन १७ ते १८ देशांना पुरवायचं काम हा देश करतोय ज्यामध्ये पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे पंजाब आणि हरियाणाच्या शेतकरी जेंव्हा रस्त्यावर उतरतो तेंव्हा त्याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यायला हवी."


पुढे बोलताना पवार साहेब म्हणाले आहेत की, "केंद्राने मात्र या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतलेली आहे असं दिसत नाही. असंच जर राहिलं तर हे आंदोलन केवळ दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही आणि देशातील कानाकोपऱ्यातील लोकं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील. त्यामुळे सरकारने अजूनही शहाणपणाची भूमिका घेतली पाहिजे".


#8_दिसंबर_भारत_बन्द


#standwith_farmer


Popular posts
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारक योगदान:-
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. *बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त* शिवसेना-युवासेना  वर्षी तसेच महाविकासाघाडी आनि वर्षी ग्रामस्थ यांच्यातर्फे बाळासाहेब ठाकरे ना अभिवादन' करण्यात आले
Image