पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत पुन्हा सक्रिय

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



*पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत पुन्हा सक्रिय*


पिंपरी :- मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे मा. पार्थ अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते, पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांसाठी, पक्ष बळकटी करण्यासाठी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे सध्या तरी चित्र पाहावयास मिळत आहे. 


पार्थ हे मावळ आणि पिंपरी चिंचवड अशा दोन्ही आढावा बैठकांना प्रदेशाध्यक्षांबरोबर आज उपस्थित होते. ते पुन्हा सक्रिय झाल्याने उपस्थितात तो चर्चेचा विषय होता. राज्यात सत्तेत आल्यानंतर प्रथमच राज्य पातळीवरची ही पहिली निवडणूक दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढत असल्याने ती जिंकलीच पाहिजे, असे पाटील यांनी पिंपरी चिंचवडच्या पदाधिकारी बैठकीत बजावले. आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे 1. यांच्यासह सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. अजितदादानंतर दोन दिवसांत प्रदेशाध्यक्ष शहरात आल्याने पदाधिकारी चार्ज झाल्याचे दिसले.


पिंपरी चिंचवड अगोदर पाटील यांनी मावळातील पक्षाची आढावा बैठक एका हॉटेलमध्येच घेतली. मावळचे पक्षाचे आमदार सुनील शेळके यांच्यासह स्थानिक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. पुणे पदवीधरमधील अरुण लाड आणि पुणे शिक्षकचे जयंत आसगांवकर हे आपले दोन्ही उमेदवार तुलनेने उजवे असल्याने आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र काम केल्यास विजय आपलाच आहे, असे सांगत पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न यावेळी केला.


पार्थ पवार या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा करिता सक्रिय झाल्याने, पक्षातील सर्वानाच सोबतः घेऊन, यावेळी पक्षाचा उमेदवार निवडून येणार च असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.