यशस्वी' संस्थेतर्फे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



यशस्वी' संस्थेतर्फे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा.


पिंपरी : दिनांक :३१ ऑक्टोबर २०२० :यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स तर्फे संस्थेच्या चिंचवड येथील कॅम्पसमध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ३१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशभरात 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरी करण्यात येते. याप्रसंगी संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील नागरिकांमध्ये परस्परांप्रती एकात्मतेची, राष्ट्रीयत्वाची भावना अखंड जोपासली जावी यासाठी आजच्या राष्ट्रीय एकता दिवसाचे महत्व अनन्यसाधारण आहे. परकीयांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील विविध संस्थानांच्या विलीनीकरणाचे अत्यंत जोखमीचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले, त्यांच्या या देशकार्याला वंदन करून राष्ट्रीयत्वाची प्रेरणा जोपासुया असे आवाहन डॉ.मुंढे यांनी केले.


यावेळी प्रत्यक्ष उपस्थित अध्यापकांनी व ऑनलाईनपद्धतीने उपस्थित असणाऱ्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सामुहिक शपथ पठण केले. याप्रसंगी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर पाळून संस्थेतील मोजके अध्यापक व अन्य कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.महेश महांकाळ यांनी केले.


फोटो ओळ : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स तर्फे राष्ट्रीय एकता दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित असलेले संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे व त्यांच्यासमवेत संस्थेचे अध्यापक व अन्य कर्मचारी वर्ग. 


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या