माथेरानमध्ये जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधा उभ्या करायच्या आहेत--आमदार महेंद्र थोरवे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



माथेरानमध्ये जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधा उभ्या करायच्या आहेत--आमदार महेंद्र थोरवे


कर्जत माथेरान,ता.27 गणेश पवार


                 आपल्या राज्यातील पर्यटक हे बाहेर देशात जाऊ नये यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे धोरण आहे. माथेरान मधील पर्यटन स्थळ जागतिक दर्जाचे बनविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष लक्ष आहे.त्यामुळे माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून या भागाचा आमदार म्हणून आम्ही येथील पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण 100 टक्के योगदान देणार असल्याचे आश्वासन कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले.दरम्यान,यावेळी 2 कोटी 13 लाखांच्या विकास कामांची भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आली.


                माथेरान गिरीस्थान नगरपालिकेच्या हद्दीतील विविध कामे यांचे भूमिपूजन आणि उद्घाटने कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते आज 27 नोव्हेंबर रोजी झाली.आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते आज माथेरान मधील पंचवटी नगर मधील उद्यानाच्या सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन करण्यात आले.त्यानंतर हुतात्मा वीर भाई कोतवाल नगरपरिषद शाळेच्या दगडी कुंपणाच्या संरक्षक भिंतीचे लोकार्पण करण्यात आले.त्याचवेळी दस्तुरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या महात्मा गांधी रस्ता ते खंडाळा पॉईंट रस्ता बनविणे कामाचे भूमिपूजन यावेळी कोनशीला अनावरण आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते झाले.तर सेंट झेव्हीयर कॉन्व्हेंट शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन आमदार थोरवे यांचे हस्ते झाले.तर नगरपरिषद कार्यालय स्वागत कमान,छत्रपती शिवाजी महाराज रोड स्वागत कमान आणि सौराबजी पांडे रोड प्रवेशद्वार कमानीचे लोकार्पण आज करण्यात आले.त्यावेळी माथेरान नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत,उपनगराध्यक्ष आकाश चौधरी,माथेरान शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी,शिवसेना तालुका उपप्रमुख अंकुश दाभणे,माथेरान नगरपालिकेचे गटनेते प्रसाद सावंत,माथेरान शिवसेनेचे संघटक प्रवीण सकपाळ,त्याच बरोबर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव,माथेरान पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


                     विकास कामांची भूमिपूजन आणि उद्घाटने झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरानकडे आपल्या राज्य सरकारचे विशेष लक्ष आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे माथेरानवर प्रेम आहे.त्यात आदित्य ठाकरे यांनी आपल्या माथेरानमध्ये राज्याच्या सर्व भागातील पर्यटक पर्यटनासाठी आले पाहिजेत हे धोरण आहे.त्या धोरणानुसार राज्य सरकार मधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील पर्यटन वाढीसाठी जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित केले आहे.त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटन बनण्याकडे वाटचाल सुरू झाली असल्याचे प्रतिपादन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी तब्बल 25 कोटींचा निधी वर्ग केला आहे.परंतु एवढ्यावर आम्ही थांबणार नाही असे आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांनी याप्रसंगी दिले.माथेरान मध्ये पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडी मधील सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन शहराचा कायापालट करणार आहेत.त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन माथेरानचा विकासाला हातभार लावू असा असा शब्द आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी दिला.ट


                 याप्रसंगी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी माथेरान मध्ये सुरू झालेली विकासाची प्रक्रिया या मतदारसंघात शिवसेनेचा आमदार कार्यरत असल्याने आणखी वेगाने सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला.तर पालिका मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी माथेरानमध्ये स्वच्छतेला प्राधान्य देऊन विकास केला जात असून पर्यवरणाचे सर्व नियम पाळून विकास करण्याचा पालिकेचा प्रयत्न केला जाईल असे स्पष्ट केले.तर पालिकेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून सकारात्मक नियोजन बद्ध विकास सुरू असून शहरातील विकास कामांची भूमिपूजने करण्यासाठी दर पंधरा दिवसांनी निमंत्रित करू आणि त्या त्या वेळी आमदार महेंद्र थोरवे माथेरानला येतील आणि मार्गदर्शन करीत असा विश्वास यावेळी व्यक्त केला.याप्रसंगी माथेरान नगरपालिकेचे  लोकप्रतिनिधी नगरसेवक शकील पटेल,नरेश काळे,राकेश चौधरी, संदीप कदम,राजेंद्र शिंदे,नगरसेविका प्रतिभा घावरे,प्रियांका कदम,सोनम दाभेकर,ज्योती सोनावळे,कीर्ती मोरे,तसेच पालिका अधीक्षक रणजित कांबळे,आदी उपस्थित होते. त्याचवेळी माजी नगरसेवक कुलदीप जाधव,प्रदीप घावरे,हे देखील उपस्थित होते.


फोटो ओळ 


विकास कामांची भूमिपूजन