पुणे प्रवाह न्युज पोर्टल
विधान परिषद निवडणूक २०२० पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांसाठी
मान्यता प्राप्त राजकीय पक्षांची गुरूवारी बैठक
पुणे, दि. ४- मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार शिक्षक व पदवीधर सार्वत्रिक निवडणूक २०२० जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार ०३-पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाचा पुणे विभागाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे.
त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक गुरुवारी दिनांक ५ नोव्हेंबर, २०२० रोजी दुपारी ४.३० वा. विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ यांच्याकडे (कौन्सिल हॉल) आयोजित करण्यात आली आहे.
सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन सौरभ राव
विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ यांनी केले आहे.