बुगी वुगी ते महाराष्ट्राज बेस्ट डान्सर, एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल बुगी वुगी ते महाराष्ट्राज बेस्ट डान्सर, एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय...  


पुणे :- 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या कार्यक्रमातून सोनी मराठी वाहिनी नृत्य कलाकारांसाठी घेऊन आली आहे एक चान्स/एक संधी! महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांतून आपली कला सादर करायला आले आहेत डान्सर्स आणि त्यांतून परीक्षक निवडणार आहेत बेस्ट डान्सर!


या स्पर्धेचं परीक्षण करणार आहेत धर्मेश सर आणि पूजा सावंत. 


 


नृत्यविश्वातलं एक प्रख्यात नाव म्हणजे 'धर्मेश सर'. आपल्या नृत्यानं धर्मेश एका रियालिटी शोमधून प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर त्यानं पुन्हा कधी मागं वळून पाहिलं नाही. चित्रपट, डान्स शोज करतकरत आज 'धर्मेश सर' नृत्यक्षेत्रात यशाच्या आणि प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोचला आहे. 


सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहरा म्हणजे पूजा सावंत! पूजा एका रियालिटी शोमधून आपल्या नृत्यानं प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर तिनं पुन्हा कधी मागे वळून पाहिलं नाही. मराठी आणि हिंदी चित्रपट करत पूजा यशाच्या आणि प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोचली आहे. 


  फार कमी लोकांना माहीत असेल की, सोनी वाहिनीवर झालेल्या बुगी वुगी या कार्यक्रमात २००८ साली पूजा सावंत आणि धर्मेश सर यांनी भाग घेतला होता. धर्मेश सर त्या पर्वाचा विजेताही होता. पूजा आणि धर्मेश सर यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात एकत्र केली आहे. बुगी वुगीच्या टॉप ५ मध्ये पूजा आणि धर्मेश सर दोघंही होते. आज एका तपानंतर दोघंही यशाच्या शिखरावर पोचले आहेत. एका रियॅलिटी शोमधले स्पर्धक ते 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या कार्यक्रमाचे परीक्षक हा प्रवास या दोघांनी एकत्र केला आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात आलेले चान्स घेतले आणि आज इथपर्यंत पोचले. सोनी मराठी वाहिनी 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या कार्यक्रमातून असाच एक चान्स घेऊन आली आहे. 


पाहा, 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर', 30 नोव्हेंबरपासून, सोम.-मंगळ., रात्री 9 वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.


Download Link - https://we.tl/t-56tRL3BC7m