पुणे प्रवाह न्युज पोर्टल
**
पुणे:- *प्रतिनिधी.सुनिल ज्ञानदेव भोसले* डॉ. श्रीकांत रामचंद्र धुमाळ हे पुण्यामध्ये राहत असुन लॉकडाऊन कालावधीत गरजु नागरिकांना अत्यावश्यक अन्नधान्य किट १४०० गरजु नागरीकांना व आदिवासी पारधी समाजातील १७० गरजु परिवारांना दिले, हे काम पाहुन संपुर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यातील ट्रस्ट चालकांनी त्यांना कोरोना योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये काही द्रस्ट नी ऑनलाइन तर काही द्रस्टनी त्यांना प्रत्यक्ष बोलवून पुरस्कार दिला. आत्तापर्यत त्यांना महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, बिहार, हरियाणा, पंजाब,झारखंड, सिक्किम, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशा, कर्नाटक, तामिळनाडू, मुंबई या राज्यातुन १०१ कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केले. डॉ.श्रीकांत धुमाळ हे निस्वार्थी भावनेने समाजसेवा गेल्या २१ वर्षापासुन करत आहे, तसेच समाजसेवा केल्याबद्दल त्यांना मानक डॉक्टर हि पदवी बहाल करण्यात आली.
अनेक पेपर व टि व्ही चॅनलनी याची व मदर तेरेसा फॉऊडेशन दिल्ली या सस्थेने पण दखल घेत सन्मान केलाय ते करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे व त्यांचे हे कार्य तरूण पिढीला प्रेरणादायी आहे,डॉ. श्रीकांत धुमाळ यांच्या कार्यास शुमेच्छा व भविष्यात त्यांनी अशाच प्रकारची गरजवंतांची सेवा करावी, त्यासाठी त्यांना ईश्वर चांगली शक्ती व आरोग्य यश किर्ती, उत्साह देवो, हि शुभकामना.