रोटरी पुणे कॉस्मोपॉलीटन तर्फे “रोटरी कोरोना योद्धा” परितोषिकांचे वितरण.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल रोटरी कलब ऑफ पुणे कॉस्मोपॉलीटनच्या वतीने अध्यक्ष रो.डॉ शरद जोशी यांच्या पुढाकाराने “रोटरी कोरोना योद्धा पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. हॉटेल फर्न येथे झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश होते. सर्टिफिकेट,स्मृतिचिन्ह,व पिपीई किट असे पुरस्काराचे स्वरूप होते.सत्कारार्थी मान्यवर पुढील प्रमाणे- लक्ष फाउंडेशन,श्री राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान ,श्री गजाननभाऊ चिंचवडे,निखिल येवले,गणेश अंबिके,मयूर वाडेकर,दत्ता खांदेभराड,नरेंद्र पाटील,डॉ.अमित भस्मे,प्रदीप जाधव,विशाखा गुप्ता,कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ हर्षला व रो.सत्यजीत यांनी केले.आभार प्रदर्शन डॉ.जितेंद्र हुंडे यांनी केले.


छायाचित्र :सत्कार करताना कृष्ण प्रकाश व शरद जोशी.