रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने संविधान दिन साजरा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने संविधान दिन साजरा


महोदय,


           २६ नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन. या दिनाचे औचित्य साधून रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने संपर्क कार्यालय येथे संविधानाच्या प्रास्ताविकेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.


           संविधान दिनानिमित्त व २६/११ ला मुंबईवर झालेला हल्ला व त्यास प्रतित्युर म्हणून आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी दाखवलेले शौर्य त्या शोर्याचा सन्मान करत पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त मा. सुधीर हिरेमठ तसेच पोलीस निरीक्षक मा. राजेंद्र निकाळजे सर या दोन कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना भारतीय संविधानाच्या प्रास्ताविक देऊन महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा गौरव केला. व २६/११ मधील शहिद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना अभिवादन केले.  


       डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी येथे भारतीय बौद्ध महासभा,रयत विद्यार्थी विचार मंच,लढा युथ संघटना,ऑल इंडिया पॅन्थर सेना,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या सामाजिक संघटनांच्या व इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक रित्या वाचन करण्यात आले.


            यावेळी संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे सर , महासचिव संतोष शिंदे , सचिव नीरज भालेराव,संघटक रोहित कांबळे,तसेच पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष महेश गायकवाड, सचिव संमाधान गायकवाड ,सदस्य अमोल गायकवाड,योगेश कांबळे,आयुष करमले उपस्थित होते.


         तरी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात यास प्रसिद्धी देण्यात यावी हि आपणास नम्र विनंती..


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image