कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे पुणे येथे आयोजन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे पुणे येथे आयोजन


पुणे :- गौतम कांबळे राज्य महासचिव कास्ट्राईब शिक्षक आघाडी यांची माहिती


 


महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक श्री अरुण गाडे केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक -22 /11/2020 रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल डेक्कन पॅव्हेलियन , नवले ब्रिजजवळ. कात्रज बायपास रोड ,वडगाव बीके. सिंहगड रोड .पुणे येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती श्री गौतम कांबळे राज्य महासचिव कास्ट्राईब शिक्षक आघाडी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली .याविषयी सविस्तर माहिती देताना श्री गौतम कांबळे म्हणाले की पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे याबाबतचा संघटनेचा लढा अधिक तीव्र करणे .


सरकारच्या मागासवर्गीय विरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी राज्यभर तीव्र आंदोलन करणे.


सर्वोच्च न्यायालयामध्ये बढतीमधील आरक्षणाबाबतची केस प्रलंबित आहे .याविषयी सर्वोच्च न्यायालयात दोन वर्षात कोणतीही सुनावणी झालेली नाही .ही बाब मागासवर्गीयांवर अन्याय करणारी आहे .या व इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर केंद्रीय कार्यकारीमध्ये चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात येणार आहे .या बैठकीसाठी सर्व केंद्रीय पदाधिकारी ,विभागीय पदाधिकारी तसेच जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती श्री गौतम कांबळे राज्य महासचिव कास्ट्राईब शिक्षक आघाडी यांनी दिली .


Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image