सिद्धार्थ चांदेकर का म्हणतोय सांग तू आहेस का?

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



सिद्धार्थ चांदेकर का म्हणतोय सांग तू आहेस का?


पुणे :- अग्निहोत्र, कश्याला उद्याची बात, जिवलगा यासारख्या गाजलेल्या मालिकांनंतर सिद्धार्थ चांदेकर पुन्हा एकदा एका नव्या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सांग तू आहेस का’ असं त्याच्या नव्या मालिकेचं नाव असून ७ डिसेंबरपासून स्टार प्रवाहवर ही मालिका सुरु होत आहे. यावर्षातला हा नवा प्रोजेक्ट असल्यामुळे सिद्धार्थ फारच उत्सुक आहे.  


या नव्या मालिकेविषयी सांगताना सिद्धार्थ म्हणाला, ‘स्टार प्रवाह वाहिनीसोबत माझं जिव्हाळ्याचं नातं आहे. कारण अग्निहोत्र ही माझी पहिली मालिका मी स्टार प्रवाहसोबत केली. चांगली वाहिनी, चांगली कथा, चांगली निर्मिती संस्था आणि चांगला दिग्दर्शक हा मेळ जुळून आल्यामुळेच ही मालिका मी स्वीकारली. लव्हस्टोरी आणि हॉरर या दोन्ही जॉनरचा अनोखा मिलाफ या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मालिकेचा हा बाज माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे. मी याआधी हॉरर जॉनरमध्ये काम केलेलं नाही. मालिकेचा सेटअप ज्यापद्धतीने तयार केला आहे तो प्रेक्षकांसाठी नक्कीच नवा अनुभव असेल. विशेष म्हणजे मालिकेत नवनवी सरप्राईजेस आहेत जी प्रत्येक भागात उलगडत जातील. या मालिकेची गोष्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवेल याची मला खात्री आहे.’


तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका ‘सांग तू आहेस का’ ७ डिसेंबरपासून रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image