सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व शिवत्व प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने                                  26 नोव्हेंबर 2020 रोजी रक्तदान शिबीर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व शिवत्व प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने 


                                26 नोव्हेंबर 2020 रोजी रक्तदान शिबीर


      पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व शिवत्व प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने शहिद दिन व संविधान दिनाचे औचित्य साधून गुरुवार दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4.00 या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक विहार येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबीराचे उदघाटन डॉ. नितीन करमळकर, कुलगुरु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या हस्ते करण्यात येणार असून प्र-कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी आणि कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदि मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.