तुम्ही फॅन्ड्री चित्रपट पाहिला आहे.. त्यामध्ये जब्या जो शेवटी दगड मारतोना तो फक्त एक साधा दगड नाही, 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



#फैन्ड्रीमधील_दगड


-------------------------


तुम्ही फॅन्ड्री चित्रपट पाहिला आहे.. त्यामध्ये जब्या जो शेवटी दगड मारतोना तो फक्त एक साधा दगड नाही, 


.....तर समानतेने असमानतेला,


.....जातीवादाला,


.....अंधरुढी परंपरेला, 


.....पुरोगामीने अधोगामीला, 


.....गुलामीने गुलामगीरी व्यवस्थेला मारलेला दगड आहे ! 


बरेच जण म्हणतात की आम्हाला शेवटच्या सिन मधील मारलेल्या दगडाचा मतितार्थ समजला आहे..पण त्या मारलेल्या दगडाचे किती जण समर्थन करतात..??


फॅन्ड्री हा एक चित्रपट नसून सामाजिक विषमतेवर केलेला प्रहार होता... जब्याने अंतिम क्षणी भिरकावलेला दगड हा जातीयतेवर केलेला घाव होता. आज समाजात कितीतरी जब्या आहेत त्यांचा जांबुवंत कधीच होत नाही. गावकुसाबाहेर गळक्या झोपडीत आजही लाखो परिवार हलाखीच्या परिस्थितित जीवन व्यतीत करत आहेत. ना शिक्षण, ना मान-सन्मान, ना सुखासीन जीवन. विषमतेचे चटके खावुन पार खचुन गेलेलं आयुष्य. फॅन्ड्रीतील जब्या, त्याच्या कुटुंबाला व ते पोटासाठी प्रामाणिकपणे करत असलेल्या कामाला प्रतिष्ठा मिळत नाही तोपर्यंत सामाजिक विषमता नष्ट झाली असे म्हणता येणार नाही.. तुम्ही उच्च जातीत जन्माला आला असाल तर नशीबवान आहात परंतु इतरांकडे तूच्छतेने पाहु नका... आपण ही मानसिकता बदलुन समाजमन जोडत नाही तोपर्यंत देशाला भविष्य नाही असे खेदाने म्हणावे लागते.....!!