16 टक्के आरक्षण मराठा समाजाचे आहे ते बाजूला काढा व उर्वरित जागा भरा.....प्रकाश आंबेडकर

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*



*16 टक्के आरक्षण मराठा समाजाचे आहे ते बाजूला काढा व उर्वरित जागा भरा. प्रकाश आंबेडकर*


*पुणे :-* सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्य सरकारनेसुद्धा राज्यातील नोकर भरती प्रक्रिया थांबवली आहे. यामुळे सर्वच स्तरातील इच्छूकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. याबाबत आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की, प्रशासन चालवणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही एखाद्या समाजासाठी शासनाने थांबणे हे चुकीचे आहे. याचा चुकीचा संदेश जातो. त्यामुळे जे 16 टक्के आरक्षण मराठा समाजाचे आहे ते बाजूला काढा व उर्वरित जागा भरा. प्रकाश आंबेडकर औरंगाबदमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.