वर्षपूर्ती निमित्ताने शांत - संयमी नेतृत्व असणारे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारची कामगिरी दमदार...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल



वर्षपूर्ती निमित्ताने शांत - संयमी


नेतृत्व असणारे मुख्यमंत्री


मा. उद्धवजी ठाकरे आणि


महाविकास आघाडी सरकारची


कामगिरी दमदार...


मुंबई : महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार चा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्या पार्श्वभूमीवर 'द स्ट्रेलेमा' या संस्थेने ठाकरे सरकारच्या कामगिरीचे सर्वेक्षण केले आहे.११ ते २४ नोव्हेंबर दरम्यान केलेल्या या सर्वेक्षणात राज्यातील सर्वसामान्य जनतेला विविध मुद्द्यांवर,सरकारच्या कामगिरीवर प्रश्न विचारण्यात आले होते.त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कामगिरी समाधानकारण असल्याचे ५९ टक्के जनतेने म्हटले आहे.तर भविष्यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पाहायला आवडेल असेही मत नोंदविण्यात आले आहे.विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कामगिरी असमाधानकारण याचे मत ५३ टक्के व्यक्तींनी नोंदविले आहे.१० हजार लोकांशी संवाद साधून काही निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचले असल्याचे स्ट्रेलेमा संस्थेचे अध्यक्ष सुशील शिंदे यांनी सांगितले आहे.हे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची कामगिरी कशी वाटते ? या प्रश्नावर ५९ टक्के लोकांनी समाधानी असल्याचे तर ३२ टक्के लोकांनी समाधानी नसल्याचे मत नोंदविले आहे.९ टक्के लोकांनी सांगता येत नाही असे मत नोंदविले आहे.


शांत आणि संयमी असलेल्या


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भविष्यात मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल असे मत २४ टक्के लोकांनी नोंदविले आहे.तर दुस-या क्रमांकांची पसंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आली आहे.२१ टक्के लोकांनी पवार यांना भविष्यात मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल असे मत नोंदविले आहे.देवेंद्र फडणवीस यांना १९ तर बाळासाहेब थोरात यांना ५ टक्के लोकांनी भविष्यात मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल असे मत नोंदविले आहे.


एकंदरीत काय तर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून विरोधकांनी रान पेटवले होती की, महाविकास आघाडी सरकारने काही च केले नाही. त्यांना हा सर्व्हे म्हणजे उत्तर म्हटले पाहिजे???


महाविकास आघाडी सरकाराचे वर्षपूर्ती निमित्ताने शांत - संयमी नेतृत्व असणारे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारची कामगिरी दमदार...