पाषाण रस्ता येथील लॉयला शाळेच्या प्रवेश द्वारासमोर ड्रेनेज लाईन तुंबून त्याचे मैलापाणी रस्त्यावर येत आहे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


पुणे :- मा ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्यासंदर्भात.


१० ते १५ दिवस झाले ड्रेनेज लाईन तुंबून त्याचे मैलापाणी रस्त्यावर येत आहे. वारंवार ड्रेनेज तुंबून मैलापाणी रस्त्यावर वाहत असल्याने त्याची दुर्गंधी परिसरामध्ये पसरली आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे ड्रेनेज वारंवार तुंबल्याने ते उताराच्या दिशेने वाहते त्यामुळे रस्त्यावर शेवाळ होऊन रस्ता निसरडा झाला आहे ते मैलापाणी येथील खोलगट भागात जमा होते त्यामुळे या रस्त्यावर वारंवार दुचाकी घसरून अपघात होत आहेत. मागील २ दिवसापूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाची दुचाकी घसरून छोटासा अपघात झाला आहे. त्यामुळे त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. खोलगट भागात पाणी साचल्याने येणाऱ्या जाणाऱ्या चव्हाणनगर पोलीस लाईन मधील रहिवाश्यांना व नागरिकांना सदर ठिकाणाहून चालणेही कसरतीचे झाले आहे. डासांचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिक थंडी तापाने त्रस्त झाले आहे. 


क्षेत्रीय कार्यालयात अनेक वेळा सांगूनही याकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नाही व दुरुस्तीही करत नसल्याने या परिसरातील नागरिकांनी या सर्व गोष्टीला कंटाळून आमच्या कार्यालयात येऊन तक्रारी देत आहेत. 


तरी आपणास विनंती कि नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता हे ड्रेनेज संबंधितांकडून त्वरित दुरुस्त करून घ्यावे. जर येत्या ४८ तासामध्ये ड्रेनेज दुरुस्त झाले नाही तर होणाऱ्या अपघातास आपणास जबाबदार धरले जाईल याची आपण नोंद घ्यावी व मनसे स्टाईल खळ्खट्याक आंदोलन केले जाईल. अशाप्रकारचे निवेदन आज मंगळवार दिनांक १३/१०/२०२० रोजी महापालिका सहाय्यक आयुक्त औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय यांना देण्यात आले. 


सहकार्य असावे,                                    आपला राष्ट्रबांधव,                                  सुहास भगवानराव निम्हण 


(अध्यक्ष शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ)