पुणे प्रवाह न्युज पोर्टल
...
दिल्ली :- ‘राफेल’ फायटर विमान प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी टू स्टार अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली इंडियन एअर फोर्सची एक टीम सध्या फ्रान्समध्ये आहे.
राफेल फायटर विमानांची दुसरी तुकडी पुढच्या काही आठवडयात अंबाला एअर बेसवर दाखल होईल.
या घडामोडींशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
भारताने फ्रान्सला ३६ राफेल विमानांची ऑर्डर दिली आहे.
त्यातील पाच विमाने २९ जुलै रोजी अंबाला एअरबेसवर दाखल झाली.
फ्रान्स ते भारत या प्रवासात अबू धाबीमधील अल धाफ्रा येथील एअर बेसवर ही विमाने एकदिवस थांबली होती.
१० सप्टेंबरला राफेल विमाने औपचारिकरित्या समारंभपूर्वक इंडियन एअर फोर्सचा भाग झाली.
पुढच्या काही आठवडयात आणखी तीन ते चार राफेल विमाने भारतात दाखल होतील.
चीन-पाकिस्तान सीमेवर तणाव असताना, ४.५ जनरेशनच्या या फायटर विमानांमुळे भारताची हवाई शक्ती कैकपटीने वाढणार आहे.
अनेक विमानांचे काम एकटे राफेल करु शकते.
दर दोन महिन्यांच्या अंतराने तीन ते चार राफेल विमाने भारताकडे सोपवली जातील अशी आय.ए.एफ. (I.A.F.) ला अपेक्षा आहे.
जून १९९७ मध्ये रशियन सुखोई-३० विमाने इंडियन एअर फोर्सला मिळाली.
त्यानंतर २३ वर्षांनी नवीन फायटर विमान एअर फोर्सच्या ताफ्यात दाखल झालं आहे.
सध्या चीन बरोबर प्रचंड तणाव असलेल्या लडाख क्षेत्रातही, गरज पडल्यास राफेल विमानांचा वापर करण्यासाठी आय.ए.एफ. सज्ज आहे.
चीनच्या चिथावणीखोर कृत्यांमध्ये इथे लष्कर हाय-अलर्टवर आहे.