सुशांत सिंह प्रकरणावरुन मुंबईला बदनाम करण्याचं कारस्थान उघड झालं ; मुंबई महापौर किशोरी पेडणेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


सुशांत सिंह प्रकरणावरुन मुंबईला बदनाम करण्याचं कारस्थान उघड झालं ;


मुंबई महापौर किशोरी पेडणेकर.....


मुंबई :- सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून आत्महत्या झाली असल्याचा अहवाल एम्सने दिला आहे. 


या अहवालानंतर महाराष्ट्र आणि मुंबईवर टीका करणाऱ्यांविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. 


“मुंबईला बदनाम करण्याचे हे कारस्थान होते, खोट्यांचे पितळ उघड पडलं आहे.” असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. 


स्वतःच्या प्रसिद्धीसाठी इतरांना बदनाम करण्याचे काम सुशांत सिंह राजपूत प्रकरणात झाले आहे. 


मुंबई पोलीस, म.न.पा., मुंबईला बदनाम करण्याचे कारस्थान रचले गेले. 


मात्र खोट्यांचे पितळ उघडे पडले आहे. 


व्हिसेरा अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल एम्स रुग्णालयाने दिला आहे. 


यामुळे लोकांचा आता मनपावरचा विश्वास वाढला आहे असंही महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. 


एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 


यंत्रणांनी काय समोर आणलं शिवसेनाला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र केले गेले. 


मात्र आमचा यंत्रणांवर विश्वास आहे, या यंत्रणांचा चुकीचा वापर केला जातो आहे. 


आरोग्य सेवा, पोलीस सेवा आणि नेत्यांची बदनामी करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी आता निर्णय घ्यावा, त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. 


मुंबईची आणि शिवसेनेची प्रतिमा मलीन करणाऱ्यांचे हात रिकामेच राहिले आहेत. मुंबईच्या जनतेने समाजमाध्यमातून त्यांना चांगले उत्तर दिले आहे असं म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला.