जुलै २०२१ पर्यंत २५ कोटी लोकांचं कोविड लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य ; डॉ. हर्षवर्धन.....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे :- भारतच नाही तर संपूर्ण जगाला करोना संकटाचा विळखा बसला आहे. करोनावरची लस नेमकी कधी येणार याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती देशाचे केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.


 सरकारकडून जुलै २०२१ पर्यंत देशातील २५ कोटी जनतेला करोनाची लस दिली जाऊ शकते असं त्यांनी म्हटलं आहे. 


संडे संवाद या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले “जुलै २०२१ पर्यंत २५ कोटी लोकांना लस देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे.


 सरकारडे ४०० ते ५०० कोटी डोस उपलब्ध होती. त्यातील २५ कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण होईल” हा अंदाज हर्षवर्धन यांनी वर्तवला आहे. 


 आणखी काय म्हणाले केंद्रीय आरोग्यमंत्री ? 


सरकार करोनावरच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी २४ तास काम करतं आहे, करोनाची लस आल्यानंतर वितरण प्रणालीचंही काम सुरु आहे. 


देशातील प्रत्येक व्यक्तीला करोना लस कशी दिली जाईल ही आमची प्राथमिकता आहे. 


करोना लशीच्या संदर्भात उच्चस्तरीय तज्ज्ञांची एक समिती कार्यरत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image