भाजयुमोच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे  सरकारची जिम उघडण्याची तयारी : विक्रांत पाटील

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे : दिनांक १६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील युवांसमोरील काही ज्वलंत प्रश्न घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यपालांची भेट घेतली. महाराष्ट्रातील असंख्य युवांचा प्रश्न म्हणजे जिम सुरू करणे, भारतीय जनता युवा मोर्चा ने त्या विषयाला हात घातला व राज्य सरकार च्या जिम विषयीच उदासीन धोरणा विषयी 'जिम खोलो आंदोलनाची' हाक दिली. आंदोलनाची माहिती मिळताच राज्य सरकार सतर्क झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी भाजयुमो कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आंदोलनाच्या घेतलेल्या परवानग्या तसेच सोशल मीडिया च्या माध्यमातून दिवसभर चालविलेली मोहीम हे सर्व विषय राज्य सरकार दरबारी पोहचले म्हणून भाजयुमोच्या आक्रमक पवित्र्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घाईघाईने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत जिम उघडण्यासाठी सकारात्मक असल्याचे बोलून दाखवावे लागले.


भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सांगितले की, आमच्या आंदोलनाच्या हाकेला मिळालेलं हे यश आहे ,म्हणून या निमित्ताने अनेक जिम चालकांशी केलेल्या चर्चेअंती असे ठरले की,राज्य सरकारला या पूर्वी अनेक संधी दिल्या त्यामुळे आता अजून एक संधी देऊन पाहावे आणि दसऱ्यापर्यंत जिम उघडण्याची सकारात्मक वाट पहावी. या सरकारने या आधीही अनेक विषयात घुमजाव ची भूमिका घेतली आहे, परंतु जिम संदर्भात अशी भूमिका राज्य सरकारने घेतली तर आंदोलनाचा आमचा पवित्रा कायम राहील; युवांची अशी फसवणूक राज्य सरकार करणार नाही तसेच युवांसाठी महत्त्वाच्या आणि अनेकांचे रोजगार ज्यावर आहेत अश्या जिम त्वरीत सुरू होतील अशी आशा व्यक्त करीत असल्याचे त्यांनी सांगितले.