बेजबाबदार रस्ता वाहूनच गेला भोसडीचा.... हळव्या कंत्राटदाराचा यामध्ये काय दोष????

पुणे प्रवाह न्युज पोर्टल काल पाऊस पडल्यानंतर हायवे ते सनसिटी इथला हा बेजबाबदार रस्ता. वाहूनच गेला भोसडीचा. काय वाटलं असेल त्या एवढ्या आपुलकीने हे लोक रस्ते बांधतात. पोटाला चिमटा घेऊन, अर्धपोटी राहून, प्रसंगी उपाशी राहून यांनी रस्ते बांधायचे....एवढी समाजसेवा करायची...पण या रस्त्यांना आहे की काही त्याचे ? आला जरा जोरात पाऊस तर हे चालले वाहून ! काही काही रस्त्यांना तर विचित्र छंद असतात. खड्डेच पाडून घेतात स्वतःला. कंत्राटदाराच्या हळव्या मनाचा काही विचारच नाही. काही रस्ते भांडकुदळ असतात. त्यांचे आणि त्यांच्यावर पसरलेल्या खडीचे नेहमी भांडण होते. मग ती त्यांना सोडून जाते. पण ती गेल्यावर ते असे चुत्त्यासारखे वाहून बिहून जात नाहीत. आहे तिथेच मेल्या मढ्यासारखे पडून राहतात. पण शेवटी ते कंत्राटदाराच्या हळव्या मनाला जपतात. काही रस्ते तर करंडकासारखे फिरते असतात. इकडे तिकडे वाहतात, फिरतात बिरतात. एक ना एक दिवस, आमचा सिंहगड रोड, लाॅ काॅलेज रोडवर नक्की भेटेल बाजीराव रोडला, असा मला विश्वास आहे. काही पक्के रस्ते मवाली असतात, काही रस्ते पक्के असतात, तर काही मातीचे रस्ते डांबरट असतात. काही रस्ते विसराळू असतात. आपण रस्ता आहोत, हेच ते विसरतात. स्वतःला डोंगर किंवा दरी समजतात. तसेच दिसायला लागतात. पण या रस्त्यांच्या या छिनाल वागणुकीमुळे हळूवार मनाचा कंत्राटदार किती दुःखी होतो, याची कल्पना नीच करदात्याला कधीच येणार नाही. आमचा हा कंत्राटदार साधारणत: वधूपित्यासारखाच असतो. एवढ्या वात्सल्याने, क्वालिटी न सोडता, लाच खायला न घालता, संगमरवर लाजेल, असे गुळगुळीत पण भक्कम रस्ते तयार करतो. लाखो, करोडो रूपयांची उलाढाल करतो. पण महानगरपालिका पडली भोळी. ती गॅरंटी म्हणून काही घेत नाही. घ्या गॅरंटी...घ्या गॅरंटी..असं कंत्राटदार तरी किती वर्षे पाठीमागे लागणार ? तो नाईलाजाने मग पुढच्या फिरत्या रस्त्याकडे वळतो...आणि नवनवीन अल्पायुषी, विसरभोळे, फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विविध भूमिका करणारे रस्ते तयार करतो...मग ते रस्ते आपल्याला सेवा देतात. तासन् तास. मग जरा कंटाळतात हो एका जागी थांबून. ५-६ फूटी माणूस ३-४ तास जरी झोपला तरी ५० वेळा या कुशीवरून त्या कुशीवर वळतो. मग एवढे लांबलचक रस्ते एका जागी थांबून कंटाळणार नाहीत ? त्यांच्या अंगावरून मोठमोठी वाहने जातात. मग दमतात हे रस्ते. मग शीण आणि कंटाळा घालवण्यासाठी जातात ते फिरायला किंवा पोहायला. काही रस्ते धीट असतात. ते डायरेक्ट वाहून जातात !! आणि निर्लज्ज माणसं कार्पोरेशनला किंवा कंत्राटदाराला शिव्या घालतात. त्यामुळे थोडक्यात, भुक्कड करदात्यांनी बोलायचेच असेल तर डायरेक्ट रस्त्यांना बोलावे नाहीतर रस्ता म्हणून ४ दिवस धरणीवर झोपून बघावे...बघा कंटाळा येतो की नाही !! नाही तुम्ही रस्त्यांसारखे उचकटून किंवा वाहून गेलात तर तुमचा सत्कार याच रस्त्यांवर महानगरपालिकेतर्फे एखाद्या हळूवार मनाच्या कंत्राटदाराच्या हस्ते करण्यात येईल !!!