वसुधैव कुटुम्बकम्चा संदेश मानव जातीला तारेल आंध्रप्रदेशचे राज्यपाल विश्‍वभुषण हरिचंदन यांचे प्रतिपादनएमआयटी डब्ल्यूपीयूत सहाव्या वर्ल्ड पार्लमेंटेचे ऑनलाईन समारोप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कृपया प्रसिद्धीसाठी                                                          दिनांक : ५/१०/२०२०पुणे, ४ ऑक्टोबर:“आज जगामध्ये आतंकवाद, दहशतवाद, रक्तपात व घातपात यामुळे समाजात अशांती व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा वेळेस भारताने जगाला दिलेला वसुधैव कुटुम्बकम्चा संदेशच संपूर्ण मानव जातीला तारू शकेल.” असे प्रतिपादन आंध्रप्रदेशचे राज्यपाल विश्‍व भुषण हरीचंदन यांनी केले.


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे ऑनलाइन जागतिक विज्ञान, धर्म आणि तत्वज्ञानावर आधारित सहाव्या वर्ल्ड पार्लमेंटचा समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.


या वेळी साउथ ऑफ्रिका येथील सामाजिक कार्यकर्त्या व पद्मभूषण डॉ.ईला गांधी, गांधी म्यूझियम लायब्ररीच्या संचालिका डॉ. वर्षा दास, अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठाचे ट्रस्टी आणि माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगर व सुप्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकरहे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.  


 तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड, कुलगुरू डॉ.एन.टी.राव, प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे, प्रा.डी.पी. आपटे, प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस, डॉ. राजीव ठाकुर व वर्ल्ड पीस डोमचे संचालक दर्शन मुंदडा उपस्थित होते.


राज्यपाल विश्‍वभुषण हरीचंदन म्हणाले,“ कोविड १९ च्या काळात जगात सर्वांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यात आपल्या नेतृत्वाची व नागरिकांची कसोटी पणाला लागली आहे. अशावेळेस लोकशाहीच्या रक्षणासाठी आजच्या तरूणांनी राजकारणात प्रवेश केला पाहिजे. त्यामुळे एका चांगल्या समाजाची निर्मिती होण्यास वेळ लागणार नाही.”


 “राष्ट्रपिता महात्मा गांधी हे देशाचे प्रेरणास्थान आहे. त्यांचे जीवन तत्व हे मानवाला सदैव उर्जा देण्याचे कार्य करीत असतात. गांधीजीच्या १५१ वीं जयंती साजरी करतांना त्यांनी सांगितलेल्या मूल्यांच्या तत्वावर सर्वांनी चालावे. भारतीय तत्वज्ञान हे ज्ञान आणि शद्धतेवर आधारलेले आहे. यांनी सृष्टीवरील सर्व हिंसक गोष्टींना आळा घातला आहे. देशातील सर्व धर्मातील तत्वज्ञान हे मानवाला जीवन जगण्याचा मंत्र देत असतात. त्यामुळे आपण धारण केलेले नैतिक मूल्ये ही सदैव आपले रक्षण करण्यास समर्थ असतात.”


डॉ. सुदर्शन अय्यंगर म्हणाले,“स्वराज्याचा संदेश देणारे महात्मा गांधी म्हणायचे प्रत्येक नागरिकाने अध्यात्मिक बनावे. अहिंसा आणि शांती या सूत्राच्या आधारेच मोहन ते महात्मा हा प्रवास त्यांचा आहे. एकीकडे संपूर्ण जगात प्रगती सुरू आहे. पण दुसरीकडे समाजातिल नैतिक मूल्य लोप पावतांना दिसत आहेत. तंत्रज्ञानाने मानवाच्या जीवनात अमुलाग्र परिवर्तन आणले परंतू गांधीच्या विचारांचा विसर पडतांना दिसत आहे. समाजाला आज चांगल्या नैतिक मूल्यांचे शिक्षण हवे. तसेच, समाजातील प्रत्येकाला अध्यात्मिक ज्ञान देणे गरजेचे आहे.”


डॉ. विजय भटकर म्हणाले,“ महात्मा गांधी यांनी सदैव शांतीसाठी लढा दिला. ही यूनीक परिषद विश्‍वाला नवा शांतीचा मार्ग दाखवेल. या संसदे मध्ये चहुअंगाच्या विषयांवर मोठ मोठ्या वक्त्यांनी आपले विचार मांडले आहे. कोरोना व्हायरसच्या काळामध्ये प्रत्येकाने अनेक अनुभव घेतलेले आहे. यामुळे २१ वे शतक मानवजात पाहू शकेल का नाही अशी शंका निर्माण झाली आहे. आज जगामध्ये ज्ञान मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यासाठी लाइब्ररी आहे. त्यातील किती घ्यायचे हे प्रत्येकाने ठरवून आपल्या जीवनाचा मार्ग निवडला पाहिजे. प्रापंचीक सत्य, प्रांतिक भाषा व परमार्थिक जीवन यांचा विचार होने गरजचेे आहे.”


पदमभूषण डॉ. ईला गांधी म्हणाल्या, “ महात्मा गांधी यांनी जीवन जगण्याचे काही सूत्र सांगितले आहे. ते नेहमी सांगत असे की मानवते शिवाय विज्ञान नाही, चांगल्या चरित्राशिवाय जीवन नाही, तत्वाशिवाय राजकारण नाही चांगल्या विचारांशिवाय नैतिकता नाही. जगात वाढत जाणार्‍या हिंसात्मक घटना, वाढती अणुशक्ती आणि कोविड १९ बरोबरच अणखी वेगळे व्हायरस मुळे मानवाचे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे. अशावेळेस गांधीजींनी सांगितलेले तत्व हे जीवनात शांती निर्माण करू शकतात.”


डॉ. वर्षा दास म्हणाल्या,“अहिंसा आणि शांतीच्या मार्गावर चालणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सदैव विश्‍व शांती नांदावी यासाठी कार्य केले. आत्म निरिक्षण, आत्म परिक्षण आणि आत्म शोध या गोष्टीवर विचार करण्याचा त्यांनी सर्वाना संदेश दिला.” 


प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ भारतीय संस्कृती, परंपरेचा आणि तत्वज्ञानाची संदेशच संपूर्ण जगाला सुख,समाधान आणि शांती देईल. अध्यात्माच्या आधारे आत्म्याला बळ मिळते या बळाच्या आधारे त्यांचे शरीर, बुद्धि आणि मनाचा चांगला विकास होतो. यातूनच शांती प्रिय समाज निर्मित होतो. विज्ञान, धर्म आणि तत्वज्ञानाचा एकत्रितरित्या विचार करण्याची गरज आजच्या काळात आहे.”


राहुल कराड म्हणाले,“या विद्यापीठात पीस नावाचा चालविल्या जाणार्‍या पाठ्यक्रमाच्या आधारे विद्यार्थ्यांच्या मनात शांतीची ज्योत पेटविण्याचे कार्य केल्या जाते. भविष्यात हे विद्यार्थी संपूर्ण जगात शांतीदूताचे कार्य करतील. विज्ञान, संशोधन, नवनिर्मिती आणि शांती यांच्या माध्यमातून परिपूर्ण तरूण घडविण्याचे कार्य विद्यापीठ करीत आहे.”


योग आणि शांती या दोन्ही गोष्टीवर मोठ्या प्रमाणात कार्य करण्याची गरज असल्याचे खासदार सुनील शास्त्री सांगितले.


प्रा.मिलिंद पात्रे यांनी पुणे डिक्लरेशनचे वाचन केले.


कुलगुरू डॉ. एन.टी.राव यांनी स्वागत पर भाषण केले.


प्रा.गौतम बापट यांनी सूत्र संचालन व प्रा.डी.पी. आपटे यांनी आभार मानले.


जनसंपर्क विभाग,


माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image