पुणे प्रवाह न्युज पोर्टल
अनिरुद्ध-संजनाच्या नात्याचं सत्य येणार संपूर्ण कुटुंबासमोर
मुंबई :- स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वीच अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्याविषयी अरुंधतीला समजलं. तिला धक्का बसला खरा पण या धक्यातून सावरत ती नव्या जिद्दीने उभी राहिली. मुलगा यशच्या मदतीने तिने आपली अधुरी राहिलेली गाण्याची आवड जोपासायचं ठरवलं. घरच्या जबाबदाऱ्या न टाळता मात्र त्यातून थोडं अलिप्त होऊन स्वत:ला वेळ द्यायचं ठरवलं. अरुंधतीचं हे वागणं अनिरुद्धला खटकत होतंच. पण आई आणि अप्पांना सत्य कळू नये म्हणून अरुंधतीमध्ये झालेला हा बदल त्याला नाईलाजाने स्वीकारावा लागला. पण सत्य फार काळ लपून रहात नाही. अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्याचं सत्य आता संपूर्ण कुटुंबासमोर येणार आहे. हा धक्का देशमुख कुटुंब पचवू शकेल का? अनिरुद्धला ते माफ करतील का हे पहाणं आता उत्सुकतेचं असणार आहे.
मंगळवार ३ नोव्हेंबरच्या विशेष भागात हे संपूर्ण नाट्य उलगडणार आहे. उत्कंठा ताणून धरणारा हा विशेष भाग असेल. कुटुंबासाठी नेहमीच उभी ठाकणारी अरुंधती आता आपल्या कुटुंबासाठी कोणतं पाऊल उचलणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. त्यासाठी पाहायला विसरु नका ‘आई कुठे काय करते’ दररोज रात्री ७.३० वाजता स्टार प्रवाहवर.