नालासोपाऱ्यात तरुणीची आत्महत्या....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



वसई: नालासोपाऱ्यात एका १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.


 परिसरातील मुलाने आणि पोलिसांनी मानसिक छळ केल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.


 या तरुणीचे सुनील माने या तरुणाशी प्रेमसंबंध होते. 


त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, परंतु नंतर लग्नाला नकार दिला. 


तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तिच्या कुटुंबियांनी सुनीलच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 


त्यावरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 


तिचा जबाब नोंदवताना तपास अधिकाऱ्यांनी तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिला अपमानास्पद वागणूक दिल्याने तिने शुक्रवारी रात्री  आत्महत्या केल्याचा तिच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. 


दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर केलेल्या आरोपाची आणि बलात्काराचीही चौकशी सुरू असल्याचे तुळींज पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.