गाईच्या शेणापासून बनवलेली चिप कमी करणार मोबाईल रेडिएशन ;  कामधेनू आयोगाचा दावा...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे :- गौमूत्र आणि शेणाचे अनेक फायदे अनेकांना माहितीच आहे.


 पण, गाईच्या शेणापासून आता चक्क अँटी रेडिएशन चिप तयार करण्यात आली आहे. ही चिप मोबाईलसाठी वापरता येणार आहे. हे आजारांविरोधात ढाल असल्याचा दावा कामधेनू आयोगानं केला आहे. कामधेनू आयोगानं गाईच्या शेणापासून अँटी रेडिएशन चिप बनवल्याचा दावा केला आहे. 


“गाईचं शेण सगळ्यांना सुरक्षित ठेवेल. गाईचं शेण हे रेडिएशन विरोधी असल्याचं वैज्ञानिकरित्या सिद्ध झालेलं आहे. 


गाईच्या शेणापासून बनवलेली अँटी रेडिएशन चिप रेडिएशन कमी करण्यासाठी मोबाईलमध्येही वापरता येऊ शकते. 


आजारांविरोधात हे एक प्रकारे सुरक्षा कवच आहे,” असा दावा कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कठीरिया यांनी केला आहे.


 कथीरिया म्हणाले,” गाईच्या शेणापासून रेडिएशन कमी करण्यास मदत होते. ही एक अँटी रेडिएशन चिप आहे. आम्हाला असं दिसून आलं आहे की, ही चिप मोबाईलमध्ये ठेवल्यास रेडिएशन कमी होते. तुम्हाला जर आजारांपासून दूर राहायचं असेल, तर याचा वापर करू शकता,” असं ते म्हणाले. या अँटी रेडिएशन चिपचं नाव गौसत्व कवच असं आहे.


 ही चिप राजकोटमधील श्रीजी गौशाळेत तयार करण्यात आलेली आहे.