पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे:-कोरोनाच्या काळात विद्यार्थी यांना विविध अडचणीला सामोरे जावे लागले.विद्यार्थी विविध प्रश्नामुळे अडचणीत आणि संभ्रम परस्थिती मध्ये होते.पण मार्च पासून आज पर्यंत जनता दल (से) विद्यार्थी संघटना कायम विद्यार्थी प्रश्नासोबत लढा देत होती.आज जनता दल (से) विद्यार्थ्यांना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संग्राम शेवाळे यांनी शालेय विभागातील विद्यार्थी येणाऱ्या अडचणी बाबत महाराष्ट्र राज्याच्या शालेय व शिक्षण मंत्री मा.वर्षा (ताई) गायकवाड यांची भेट घेतली.शेवाळे यांनी विविध विषयांवर चर्चा केली.प्रामुख्याने फी वाढ सबंधित संग्राम शेवाळे यांनी मंत्री महोदयांना विद्यार्थी यांची बाजू समजून सांगून फी कमी करण्यासाठी विनंती केली.तसेच संघटनेची गेली पंधरा दिवस झाली इयत्ता पाचवी आणि आठवी विद्यार्थी यांचे शिष्यवृत्ती परीक्षांचे निकाल लावा याबाबतीत स्वतः संग्राम शेवाळे यांनी गायकवाड मॅडम यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला होता.दोन दिवसांपूर्वी त्या परीक्षांचे निकाल लागले आहेत.त्यामुळे त्यांनी स्वतः भेटून संघटनेच्या वतीने आभार मानले.