शेमारू मराठीबाणा’ वाहिनीवर नवरात्र स्पेशल महामूव्ही

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



मुंबई :- सध्या सगळ्यांना वेध लागले आहेत ते नवरात्र उत्सवाचे. नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव. चैतन्य व उर्जा पुरविणारा देवीचा हा उत्सव. हा नवरात्रौत्सव अधिक मंगलमय करीत प्रेक्षकांना मनोरंजनाचा आनंददायी ठेवा देण्यासाठी ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने दैवी शक्तीची प्रचीती देणाऱ्या ‘कुंडमाऊली मळगंगा’ आणि ‘माता एकवीरा नवसाला पावली’ या दोन भक्तीमय चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आणली आहे.


श्रीमळगंगा देवीचे माहात्म्य सांगणारा ‘कुंडमाऊली मळगंगा’ हा चित्रपट घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे शनिवार १७ ऑंक्टोबरला दुपारी १२.००वा व सायंकाळी ६.००वा पहाता येईल. गुप्तधन व देवीची लीला या विषयावर आधारित असलेल्या कौटुंबिक भक्तिपर चित्रपटात अलका कुबल यांनी देवीची भूमिका साकारली आहे. राहुल सोलापूरकर, प्रसाद ओक, राजश्री लांडगे, माया जाधव आदींच्या भूमिका आहेत.


महाराष्ट्रात देवींची साडेतीन शक्तिपीठे मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुकामातेचा अवतार म्हणजे एकवीरा देवी होय. आई एकवीरा देवी ही आदिशक्ती असून, नवसाला पावणारी देवी म्हणून एकवीरा देवीची ख्याती आहे. मोहन जोशी, क्रांती रेडकर, सुशांत शेलार, रमेश भाटकर या कलाकारांच्या भूमिका असलेल्या ‘माता एकवीरा नवसाला पावली’ या चित्रपटात एका कुटुंबाची अडचण देवीच्या कृपेने कशी दूर होते याची कहाणी सांगितली आहे. रविवार २५ ऑंक्टोबर दसऱ्याच्या मुहूर्तावर दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ६.०० वा. या चित्रपटाचा आस्वाद घेता येईल.


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या