टी.आर.पी.’ घोटाळ्याशी संबंधित आरोपीला अटक

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


‘टी.आर.पी.’ घोटाळ्याशी संबंधित आरोपीला अटक


पुणे :- टी.आर.पी. घोटाळ्यात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने आणखी एका आरोपीला उत्तर प्रदेश येथून अटक केली. विनय त्रिपाठी (३२) असे या आरोपीचे नाव असून तो हंसा रिसर्च ग्रुप कंपनीचा माजी कर्मचारी आहे. गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे आणि पथकाने टी.आर.पी. घोटाळा उघडकीस आणून फक्त मराठी, बॉक्स सिनेमा या वाहिन्यांच्या मालकांसह हंसा कंपनीचा माजी रिलेशनशिप मॅनेजर विशाल भंडारीसह चौघांना अटक केली होती. यातील विशाल आणि उत्तर प्रदेशातून अटक केलेल्या विनय यांच्यात मोठय़ा रकमांचे आर्थिक व्यवहार घडल्याची माहिती पथकाला मिळाली. त्याआधारे विनय याला अटक करण्यात आली. आर्थिक व्यवहारांचा तपास करण्यासाठी न्यायवैद्यक पर्यवेक्षक (फॉरेन्सिक ऑडिटर) नेमण्याचा निर्णय घेतल्याचे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आतापर्यंतच्या तपासात टी.आर.पी. घोटाळयात सहभागी असलेल्या फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टी.व्ही. यांच्या बँक खात्यांवरून कोटय़वधींचे व्यवहार घडले आहेत. या व्यवहारांची गुंतागुंत उलगडण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटरची मदत होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. त्या तपासासाठीच फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा यांची खाती गोठवण्यात आल्याचेही गुन्हे शाखेने स्पष्ट केले. विशेष पथकाने हंसा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण निझाम यांचा जबाब तर उपव्यवस्थापक नितीन देवकर यांचा पुरवणी जबाब नोंदवला.