पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे :- भारतीय संविधान निर्माते, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार, बहुजन हृदयसम्राट, राष्ट्रीय नेते श्रद्धेय ऍड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल फेसबुक या सोशल मीडिया च्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी (समाज कंटकांने)या जातीयवादी मानसिकता असलेल्या, समाजकंटकाने गलिच्छ भाषेत पोस्ट करून, अपमान केला होता. तसेच या घटनेने तमाम बहुजन समाजाची , आंबेडकरी जनतेची भावना दुखावली गेली होती. तसेच सर्वत्र संतापाची लाट उसळली गेली होती. या घटनेच्या निषेधार्थ सदर आरोपी (समाज कंटकावर) या समाजकंटकावर तात्काळ गुन्हा दाखल होऊन, कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी काल दिनांक ११ ऑक्टोबर रोजी खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले गेले होते. आणि आज दिनांक १२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ठीक ११:०० वाजेपासून खडक पोलीस स्टेशन, शुक्रवार पेठ, पुणे येथे सर्व पुणे शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक/युवती, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी लावून धरली. कार्यकर्ते आणि बहुजन समाजाचा आक्रोश पाहता,पोलीस प्रशासनाने तात्काळ फिर्याद नोंद करून ,सदर आरोपीवर अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती अधिनियम १९८९ - ३(१)(r),अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती अधिनियम १९८९- 3(2)(va),भारतीय दंड सहिता १८६० - ५०५ (२) नुसार खडक पोलीस स्टेशन येथे आज सायंकाळी ८:१५ वाजेपर्यंत गुन्हा नोंद करण्यात आला.
यावेळी मा. संतोष संखद सर ( महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते ), मा. मूनवर भाई कुरेशी ( पुणे शहर अध्यक्ष ) ,मा.लक्ष्मणभाऊ आरडे ( पुणे शहर उपाध्यक्ष ) , मा. अतुल भाऊ नाडे ( पुणे शहर युवक अध्यक्ष ) ,
मा. शुभम भाऊ चव्हाण ( सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर अध्यक्ष ), मा.शंकरभाऊ भालेराव (पुणे शहर युवक संघटक ) , मा.ऍड.मनोज माने सर ( कायदेशीर सल्लागार ),
मा.कपिलभाऊ शिवशरण ( पुणे शहर युवक कार्यध्यक्ष ), मा. मनोज अप्पा क्षीरसागर ( पुणे शहर युवक सचिव ),
मा. पंचशीला ताई कुडवे ( पुणे शहर महिला आघाडी, नेत्या ), मा. शतुलभाऊ नाडे, मा. ओंकारभाऊ कांबळे,
मा. अक्षयभाऊ तायडे, मा. अतुलभाऊ गवळी, मा. राहुलभाऊ जगताप,
मा. निखिल जाधव ( वंचित बहुजन आघाडी, युवा नेते ), मा. कौस्तुभ ओव्हाळ
( सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर महासचिव ), मा. सुरज गोऱ्हे ( सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर उपाध्यक्ष ), मा. अमर क्षीरसागर ( सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर संघटक ) , मा. जितेंद्र जाधव सर ( वंचित बहुजन आघाडी पुणे शहर महासचिव ), मा.उत्तमशेठ वनशिव ( भारिप माजी अध्यक्ष पुणे जिल्हा ),
त्याचप्रमाणे (शिवाजी नगर मतदार संघ प्रमुख मा.रणजीत केदारी.),
मा.अजय कोरके (संघटक पुणे), *मा.विक्रांत बेंगळे (प्रभागअध्यक्ष)
यांच्यासह अनेक पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.