PCOS मुळे महिलांच्या केस गळण्यावर आता अधिक प्रभावी आणि प्रगत उपचार: जर्नल ऑफ कॉस्मेटिक डर्मेटॉलॉजीमध्ये अभ्यास प्रकाशित

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


PCOS मुळे महिलांच्या केस गळण्यावर आता अधिक प्रभावी आणि प्रगत उपचार: जर्नल ऑफ कॉस्मेटिक डर्मेटॉलॉजीमध्ये अभ्यास प्रकाशित


पुणे, 06 ऑक्टोबर, 2020: पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचा (PCOS) त्रास असणाऱ्या महिलांमधील पॅटर्न अॅलोपेशियावर उपचार करण्यासाठी QR678® हेअर ग्रोथ फॅक्टर फॉर्म्युलेशन प्रभावी ठरत आहे, असा निष्कर्ष सेलिब्रेटी कॉस्मेटिक सर्जन डॉ. देवराज शोम आणि भारतात सर्वत्र एस्थेटिक क्लिनिक्स™ चे नेतृत्व करणाऱ्या डर्मेटॉलॉजिस्ट डॉ. रिंकी कपूर यांनी केलेल्या अभ्यासामध्ये काढण्यात आला आहे. डॉ. शोम व डॉ. कपूर यांनी QR678® हेअर ग्रोथ थेरपीचा शोध लावला.


या अभ्यासाला मिळालेले यश हे कॉस्मेटिक ब्युटी उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. केस हा महिलांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा घटक आहे. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होणारा PCOS व त्याच्या दुष्परिणामामुळे गळणारे केस, तसेच शरीरावर अन्यत्र उगवणारे केस यामुळे स्त्रियांचा आत्मसन्मान, प्रतिमा आणि आत्मविश्वास यांना धक्का बसतो. PCOS असणाऱ्या अंदाजे 20-30% स्त्रियांना फिमेल पॅटर्न हेअर लॉसचा त्रास होतो. कॉस्मेटिक सर्जन व QR678 चे जनक डॉ. देवराज शोम यांच्या मते, “यामुळे भारतातील कॉस्मेटॉलॉजी क्षेत्रामध्ये नवे विश्व खुले होणार आहे. सौंदर्याशी संबंधित असलेल्या अनेक समस्यांपैकी एक समस्या यामुळे सुटणार आहे आणि ती महिलांसाठीच्या ब्युटी उद्योगामध्ये परिवर्तन आणणार आहे.”


अॅलोपेशिया व PCOS बरे करण्याच्या दृष्टीने QR678® व QR678 निओ® थेरपीचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने हा अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास करण्यासाठी ब्रॉड रेंज पद्धत वापरून, ग्रेड I व II लुडविग स्केल असलेल्या, PCOS फिमेल पॅटर्न असलेल्या 20 25 वर्षे वयोगटातील 20 महिला निवडण्यात आल्या. दर 3 आठवड्यांनी प्रत्येकी 8 सत्रे यानुसार रुग्णांच्या टाळूवर QR678® हे सोल्यूशन लावण्यात आले. मूल्यमापन करण्यासाठी जागतिक प्रमाणित फोटोग्राफीचा वापर करून, 8 सत्रांनंतर सुधारणा नोंदवण्यात आली. 20 महिलांमध्ये 11.66 कमी व्हेलस हेअर, 13.77 अधिक टर्मिनल हेअर आढळल्याचे आणि हेअर शाफ्ट व्यास बेसलाइनपेक्षा 2.86 μm रुंद असल्याचे दिसून आले. “या यशस्वी अभ्यासाच्या माध्यमातून, PCOS असणाऱ्या महिलांमध्ये आढळणाऱ्या केस गळणे या समस्येवर काय उपाय असू शकतो, हे अधोरेखित झाले. यानंतरच्या चाचण्या व त्या अनुषंगाने केलेले अभ्यास यशस्वी झाले तर PCOS व संबंधित विषय हाताळल्या जाणाऱ्या स्त्रीरोग या क्षेत्रामध्ये याविषयी अधिक जागृती करण्याचे आमचे नियोजन आहे”, असे रिंकी कपूर म्हणाल्या. PCOS असणाऱ्या रुग्णांमध्ये QR678® व QR678 निओ® वापरून केलेला हा पहिलाच अभ्यास होता.


डॉ. देवराज शोम यांच्याविषयी:- डॉ. देवराज शोम हे फेशिअल प्लास्टिक सर्जरी व फेशिअल कॉस्मेटिक सर्जरी यासाठी नवीन तंत्र व सोल्यूशन विकसित करण्याच्या बाबतीत गेले दशकभर जागतिक स्तरावरील प्रवर्तक आहेत. या कॉस्मेटॉलॉजीमधील मोजक्या सुपर स्पेशालिस्टपैकी एक आहेत. फेशिअल कॉस्मेटिक सर्जरीमध्ये अमेरिकन बोर्ड सर्टिफाइड असणारे ते आशियातील पहिले सर्जन आहेत.


डॉ. शोम हे ‘डिअर पीपल, विथ लव्ह अँड केअर, युवर डॉक्टर्स'चे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले व बेस्ट-सेलिंग लेखक आहेत. काही आठवडे सलग बेस्टसेलर हे स्थान कायम राखलेले हे पुस्तक म्हणजे, प्रत्यक्ष जीवनातील डॉक्टर व रुग्ण यांच्या नात्यावर आधारित लघुकथांचा संग्रह आहे. त्यांनी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नलमध्ये 50 हून अधिक आंतरराष्ट्रीय अहवाल सादर केले आहेत. QR678 हेअर ग्रोथ फॅक्टर इंजेक्शन्सचेचे पेटंट डॉ. शोम यांच्याकडे आहे. हेअर ग्रोथ फॉर्म्युलेशनला अमेरिका व भारत यासह विविध ठिकाणी पेटंट मिळाले आहे.


डॉ. रिंकी कपूर यांच्याविषयी:- डॉ. रिंकी कपूर या भारतातील आणि मुंबईतील सर्वोत्तम व लोकप्रिय डरमेटॉलॉजिस्टपैकी एक आहेत. नॉन-इन्व्हेजिव्ह व नॉन-सर्जिकल स्किन रिज्युव्हनेशन उपचारांमध्येही त्यांचा हातखंडा आहे. योग्य परिणाम मिळण्यासाठी विविध उपचारांची सांगड घालण्याची विशेष क्षमता त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच त्या भारतातील एक सर्वोत्तम डरमेटॉलॉजिस्ट ठरतात.