पुणे प्रवाह न्युज पोर्टल
प्रति
मा. संपादक साहेब
विषय : महोदय,
उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस या गावातील मनीषा वाल्मिकी या तरुणीवर ४ नराधमांनी बलात्कार करून तिची जीभ कापण्यात आली व तिच्या मानेचे हाड मोडले अश्या विचित्र पद्धतीने तिच्यावर अमानुषपणे अन्याय अत्याचार केले व शेवटी तिचा मृत्यू झाला. व प्रशासनाने मनीषाचा मृत्यूदेह तिच्या परिवाराकडे न सोपविता रात्री २ वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार केले. यामुळे संपूर्ण देशभर प्रशासनाविरोधात तसेच उत्तर प्रदेश सरकार विरोधात संतापाची लाट उसळली आहे..
रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने या अमानुष कृत्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी व मनीषा वाल्मिकी या आमच्या भगिनीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संस्थेच्या संपर्क कार्यालय पिंपरी या ठिकाणी मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उत्तर प्रदेश सरकार, आरोपी यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर समनव्यक अर्चना परब यांनी असे मत व्यक्त केले कि भाजप सरकारच्या राज्यात गाई सुरक्षित आहेत पण ताई सुरक्षित नाही त्यामुळे सरकारला जर महिलांचे रक्षण करता येत नसेल तर त्यांनी आम्हाला आत्मरक्षणासाठी शस्त्र परवाने द्यावे. शहर समनव्यक प्रतिभा बनसोडे यांनी मत व्यक्त केले कि सरकार जर महिलांचे मुलींचे संरक्षण करू शकत नसेल तर बेटी पढाव बेटी बचाव अश्या योजना सरकारला चालवण्याच्या अधिकार नाही त्यांनी असले खोटारडे ढोंग बंद केले पाहिजे.. तसेच शहर सहसचिव भाग्यश्री आखाडे या असे म्हणाल्या कि आमचा कोणत्याही सरकारला विरोध नसून बलात्कारी मानसिकतेला विरोध आहे त्यासाठी शासनाने कायद्यांची कठोर अंमलबाजवणी करून आरोपीना तात्काळ फाशी देण्याची तरतूद केली पाहिजे जेणें करून बलात्कारी लोकांच्या मानसिकतेला आळा बसेन.
यावेळी संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे सर, महासचिव संतोष शिंदे, उपाध्यक्ष संदेश पिसाळ, संघटक रोहित कांबळे,सचिव नीरज भालेराव,सहसचिव भाग्यश्री आखाडे,समनव्यक अर्चना परब, समनव्यक प्रतिभा बनसोडे, प्रणव गायकवाड ,सुशांत कांबळे यावेळी उपस्थित होते
तरी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात यास प्रसिद्धी देण्यात यावी हि आपणास नम्र विनंती.
आपला विश्वासू
संतोष शिंदे
महासचिव महा. राज्य